पुणे- रविवारी दुपारनंतर लागलेल्या भीषण वणव्यामुळे लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती जवळील वनविभाग परिसर येथील ग्रीन फाउंडेशन ऑक्सिजन पॉईट क्र 3 येथे 2 हेक्टर क्षेत्रावरील झाडे भस्मसात झाली आहे ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप तसेच वनविभाग लोणी यांनी घटना स्थळी दाव घेत आवघ्या काहि तासात आग विझविण्यात वनविभागाला यश आले. ऑक्सिजन पॉईट क्र 3 येथील मोठा भाग भस्मसात झाला आहे. या डोंगराच्या विविध दोन भागात रविवारी आग पहायला मिळाली. त्यामुळे वनसंपदेची मोठी हानी झाली आहे.
लोणी काळभोर पुणे जिल्ह्यातील एक संपन्न ऑक्सिजन पॉईट क्र 3 म्हणून या डोंगररांगांची ओळख आहे. गेल्या काही वर्षात येथे निसर्गसंपन्नता टिकल्याने विविध पक्षी, प्राण्यांचा वावर या भागात वाढला आहे. लोणी काळभोर आणि आसपासच्या डोंगर भागात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचेही गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्राणीसंपदेमुळे संवेदनशील लोणी काळभोर डोंगराला पाहिले जाते आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या डोंगरावर आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले आहे .
ग्रीन फाऊंडेशन च्या सदस्यांनी पुढे येत वन विभाग ला आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यामुळे अवघ्या काही तासात आग आटोक्यात आणण्यात वन विभाग , ग्रीन फाऊंडेशनला यश आले.

