शिर्डी । प्रतिनिधी :
कोविड काळात आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शिर्डी शहरातील गाळेधारक, मालमत्ताधारक यांचे थकित गाळेभाडे तसेच नळपट्टी, घरपट्टी संदर्भातील शिर्डी नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पठाणी वसुली थांबवून करमाफी देण्यात यावी या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. यासाठी शिर्डीकरांच्यावतीने शुक्रवारी सकाळी हजारोंच्या संख्येने नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावर महाआक्रोश मोर्चा धडकवून नगरपंचायत प्रशासन व राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
मागील दोन वर्षापासून कोविड काळात लॉकडाऊन तसेच साईमंदीर बंद असल्याने शिर्डी शहरातील छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटाच्या खाईत सापडले आहे. नगरपंचायतने शहरातील व्यवसायिक, नागरिकांना करमाफी, गाळेभाडे माफीसाठी नगरपंचायत प्रशासनाने सरकार व नागरिकांची दिशाभूल करणे थांबवावे. यापूर्वी शिर्डी नगरपंचायतीच्या सभागृहात एकमताने घेतलेल्या निर्णयाचे व यासंबंधी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून तातडीने करमाफी व गाळे भाडे माफी द्यावी यासाठी काल शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील हजारो ग्रामस्थांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारकामाई पासून महाआक्रोश मोर्चाला सुरुवात केली. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या तसेच नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली. या मोर्चात पोतराजांनी आपले पारंपारिक वाद्य वाजवून तसेच अंगावर चाबकाचे फटके ओढत नगरपंचायत प्रशासन व राज्य सरकारचा निषेध केला.
यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नितीन उत्तम कोते,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, साई निर्माणचे अध्यक्ष विजयराव कोते, शहराध्यक्ष सचिन शिंदे, अॅड. अनिल शेजवळ, सुजित गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, गजानन शेर्वेकर, गोपीनाथ गोंदकर, राजेंद्र कोते, नितीन शेळके, मधुकर कोतेे, किशोर गंगवाल, विष्णू थोरात, रामशाम कोते, मनसे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते, देवानंद शेजवळ, रवींद्र गोंदकर, दिपक वारुळे, अरविंद कोते, राजेंद्र शिंदे, दत्ता गोविंद कोते, गणेश दिनकर कोते, विकास गोंदकर, गफ्फारखान पठाण, बिलाल शेख, संदिप पारख, सोसायटीचे विजयराव कोते, वसंत शेळके, प्रमोद गोंदकर, देवराम सजन, मनोज लोढा, दादाभाऊ गोंदकर, नाना काटकर, सुधीर शिंदे, विनायक कोते, साईराम गोंदकर, बाबासाहेब गोंदकर, शब्बीरभाई सय्यद, दत्तात्रय गोंदकर, विजय गायकवाड, विकास कोते, शंकर कोते, सलीम शेख, समीर विर, रजनीताई जोगळेकर, अलकाताई शेजवळ, सोनाली धिवर, शिल्पा गायकवाड, जुगनू पठाण, दिनकर कोते, भाऊ भोसले, धनंजय साळी, पंडित शेळके, जितेंद्र शेळके, अजित पारख, बाळासाहेब माधव कोते, निखिल बोरावके, कमलेश लोढा, प्रितम लोढा, संजय संकलेचा, संदीप नागरे, हिम्मत शेवाळे, गणीभाई पठाण, बाळासाहेब गोर्डे, वैभव कोते, अविनाश गोंदकर, मुकुंद गोंदकर, किरण कोते, अभिजित कोते, राहुल रावते, केशव जाधव, नंदू कोते, राजेंद्र गोंदकर, प्रसाद सुरंजे, वैभव सोनवणे, रामभाऊ पिंगळे, प्रकाश पवार, गिरीश सोनी, एजाज पठाण, साहिल शेख, प्रसाद सुर्यवंशी, राजू गायके, नंदू शेळके, साई कोते, संजय बनकर, बापू गोंदकर, सचिन आढाव, विजय गायके, रोशन कोते, राहुल आहेर, संतोष देवकर, बंडू चौधरी, अरुण कोते, अमोल देवरे, गणेश सावंत, महेमुद शेख, सतिश शिंदे, राजू मांडवा, विलास कोते, अमोल कोते, संपत गाढे, शफीक शेख आदींसह भाजपचे पदाधिकाऱी, ग्रामस्थ, महिला भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पठाणी वसुली बंद करा, नळ कनेक्शन तोडणे बंद करा, गाळेभाडे माफ करा, घरपट्टी नळपट्टी माफ करा, लाखोंचा निधी मिळतो संस्थानकडून तरी पंचायत करवसुली करते आमच्याकडून अशाप्रकारचे फलक मोर्चात दिसून आले. यावेळी भाजपचे राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, रवींद्र गोंदकर, अॅड. अनिल शेजवळ, हरिश्चंद्र कोते, नाना काटकर, सुजीत गोंदकर, सचिन शिंदे, रजनीताई जोगळेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन नितीन कोते यांनी केले.

