shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राहाता तालुका व शिर्डी शहर कार्यकारिणी साठी नवीन पदाधिकारी यांची करण्यात आली नियुक्ती..!

शिर्डी । प्रतिनिधी : दि. 27/02/2022
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या राहाता तालुका व शिर्डी शहर कार्यकारिणी साठी नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तसेच शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष मा. श्री ज.मो.अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा प्रमुख प्रा.अंबादास शिंदे यांनी शिर्डी येथे भेट दिली. शिवसेना नेते मा.श्री. कमलाकर कोते पा. यांच्या शिवालय या शिवसेनेच्या कार्यालयात शिक्षक सेनेच्या नूतन कार्यकारिणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 

शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिवसेना भक्कमपणे शिक्षकसेनेसोबत उभी राहील असे प्रतिपादन श्री. कमलाकरजी कोते पा यांनी केले तसेच शिक्षक सेनेच्या नूतन पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या वतीने प्रा.अंबादास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. राहाता तालुक्यातील शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा व राज्य शिक्षक सेना सदैव तत्पर राहील असे आश्वासन यावेळी जिल्हाप्रमुख शिक्षण सेना जिल्हा अध्यक्ष प्रा अबादास शिंदे सर
यांनी दिले. 

याप्रसंगी युवा नेते राहुल गोंदकर राहाता तालुका प्रमुख अजिंक्यदेव गायकवाड, शिर्डी शहर प्रमुख नंदकुमार जाधव, उपतालुका प्रमुख भाऊसाहेब लवांडे, सुहास वाणी, संदीप गमे, सिद्धार्थ कोबरणे, चंद्रकांत वारुळे, अक्षय वाघ, संतोष ढाकणे, दीपक झुरळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
close