श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी अंजुमभाई शेख मित्रमंडळाच्यावतीने प्रभाग क्र.३,१० व ११ मधील सर्व नागरीकांसाठी ज्यांना शिधापत्रिका नाही त्यांना नविन शिधापत्रिका,ज्यांच्या शिधापत्रिका जिर्ण (खराब) झाल्या अथवा हरवल्या आहेत त्यांना दुबार शिधापत्रिका तथा शिधापत्रिका विभक्त करुन देण्यासाठीचा उपक्रम राबविण्यात येत आहे,
याकरीता संबंधित लाभार्थ्यांनी १) आधार कार्ड,२) मतदान कार्ड,३) वीज बील,४) रेशन दुकानदाराचा दाखला,५) तलाठी कार्यालयाचा उत्पन्न व रहिवाशी दाखला,६) कुटुंब प्रमुखाचे २ पासपोर्ट साईज फोटो,७) जर कुठलीही शिधापत्रिका नसेलतर १००/- रुपयांच्या स्टॅम्पवर (मोफत) प्रतिज्ञापत्रही करुन मिळेल,तरी वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्र येत्या दहा दिवसांपर्येंत वेस्टन टॉवर्स, मौलाना आझाद चौक, वॉर्ड क्र.२, श्रीरामपूर याठिकाणी,श्री.सय्यद असलम गुलाम मोबा.क्र.९८२३४११७४६ यांच्याकडे जमा करावे असे अवाहनही हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुख्तारभाई शाह,रविंद्र गुलाटी,राजेश अलघ,सौ.समीना शेख,ताराचंद रणदिवे,कलिम कुरेशी,जायदाबी कुरेशी,प्रकाश खोले,सोहेल दारुवाला, सुरेश शिंदे,रज्जाक पठाण, महेबुब कुरेशी, किशोर शिंदे, महेबुब शाह,अनिल इंगळे,आप्पा शिंदे,अहमद शाह,गुलशेर पठाण,अमजद पठाण,सादीक शेख,जावेद शेख आदींनी केले आहे.

