पूर्णा । सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी ईनामे ईतबारे चांगली सेवा देतात. त्यांची भूमिका महत्वाची आहे. अलिकडे मोबाईलकडे तरूण मोठ्या जात आहे. परंतू पुढील पिढीसाठी पूस्तकांशिवाय पर्यायच नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रविवारी ( ता.०६) रोजी परभणी जिल्हा ग्रंथालयाच्या ४४ व्या अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी केले.
परभणी जिल्हा ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशन व स्वा.सै.सुर्यभानजी पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळा प्रसंगी आचल बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण लांडे, उदघाटक जिल्हाधिकारी आंचल गोयल, प्रमुख उपस्थितीत कातकडे, राम मेकले, गुलाबराव मगर, डाॅ.मधूकर यांची उपस्थिती होती.
यावेळी जिवन गौरव पुरस्कार पालम येथील ग्रंथपाल जिवन लोखंडे यांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुढे बोलतांना आंचल गोयल म्हणाल्या की, ग्रंथालयात आल्यावर मला माझ्या जिवणातल्या आठवणी जाग्या झाल्या. समाजासाठी ग्रंथालये महत्वाची भूमिका बजावतात. अलिकडच्या काळात तरूणांमध्ये वाचन क्षमता कमी झाली आहे. ती सुधारणे गरजेचे आहे.

