shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परभणी रेल्वे स्थानकावर तीन लाख रुपयाचा माल लंपास..! रेल्वे पोलीस मात्र गप्प..! पूर्णा तळीराम व गुन्हेगाराचा बनला अड्डा...!

पूर्ण । प्रतिनिधी:- दक्षिण-मध्य रेल्वेच्या परभणी रेल्वे स्थानकावर मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी आपले बस्तान बसवले असून दोन दिवसापूर्वी परभणी रेल्वे स्थानकावरील तीन लाख रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मशीन चोरट्यांनी हातोहात लंपास केल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे मराठवाड्यातील सर्वात जुनी निजामकालीन रेल्वे स्टेशन परभणी कडे *पहिलीसाठी* या रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस चौकी आहे, परंतु या पोलिस चौकीतील कर्मचारी मात्र गप्प झाले असून रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे येथील रेल्वे स्थानकावर दोन दिवसापूर्वी शासकीय मालकीची सुमारे तीन लाख रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मशीन चोरीला गेल्याची जोरदार चर्चा आहे.दरम्यान पुन्हा एका व्यापाऱ्याचे आठ हजार रुपये किमतीचे ऐवज लंपास झाला असून यामध्ये पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, काही कपडे असा माल लंपास झाला आहे.

 रेल्वे पोलीस सुद्धा याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून मागील दोन दिवसांपूर्वी झालेला प्रकार हा काकिनाडा ते शिर्डी एक्सप्रेस मध्ये झाला असून मिरखेल पिंगळी दरम्यान या चोरट्यांचे बस्तान असून मागील अनेक वर्षापासून रेल्वेमध्ये चोरीचे‌ प्रकार वाढले आहेत. 

परभणी येथील सुरक्षा दलाचे अधिकारी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून सर्वसामान्य प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.हा प्रकार नींदनीय आहे.
close