लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर......
पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतू च्या लेखणी ने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं .. लताचा आवाज हा मानवी सुष्ठीतला एक अद्भुत चमत्कार आहे..
!
*साक्षात विधात्याला असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही*
*श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद ,उर्वशीच्या नुपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल .. सूर ,लय ,ताल ,सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर अस म्हणावं...*
*....कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली.....*
*ल ता मं गे श क र*🌷

