भोंग प्रतिष्ठान निमगाव केतकी यांचेवतीने गुणवंताचा सत्कार संपन्न.
*राष्ट्रपती पोलिस पदक जाहिर झाल्याबद्दल विजय भोंग यांचा सन्मानपञ देवून विशेष गौरव.*
इंदापूर प्रतिनिधी:दि ५ फेब्रुवारी २०२२ संत सावतामाळी मंदिर निमगाव केतकी येथे भोंग प्रतिष्ठानच्यावतीने भोंग परिवारातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरुवातीला गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी धनश्री भोंग हीने अभंग म्हणून उपस्थितांची मने जिंकली.
पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहिर झाल्याबद्दल सन्मानपञ देवून विजय भोंग सहाय्यक पोलीस निरिक्षक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानपञाचे वाचन राजू भोंग यांनी केले.त्याचबरोबर मीना भोंग उपसरपंच निमगाव केतकी , मच्छिंद्र भोंग उपसरपंच शेळगाव , सुधाकर भोंग हिंदी भाषारत्न पुरस्कार , सीईटी परीक्षा उत्तीर्ण वर्षा भोंग व अश्विनी भोंग , नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेले श्रेयशी भोंग , अर्णव भोंग , सातारा सैनिक स्कूल प्रवेश मिळवलेला विश्वजीत भोंग , प्रशांत भोंग यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती अंकुश जाधव , दत्ताञय शेंडे यांनी मनोगते व्यक्त केली. पंचायत समिती सदस्य देवराज जाधव , माजी उपसरंच तात्यासाहेब वडापुरे , राष्ट्रवादी महिला अध्यक्ष छाया पडसळकर , माजी उपसभापती शालनताई भोंग , ॲड सचिन राऊत , राजू जठार , ॲड संदिप शेंडे , तुषार खराडे , अक्षय पाटील , संदिप भोंग , काशीनाथ भोंग , पोलिस उपनिरिक्षक अनिल भोंग , दिलीप भोंग , तालुका कृषी अधिकारी आनंद भोंग , सहा.अभियंता छगन भोंग , परशुराम भोंग सहा सहकारी अधिकारी , स्वप्निल भोंग RTO , पांडुरंग भोंग निवत्त नायब तहसिलदार प्रमुख उपस्थित होते.
सत्कार समारंभाचे प्रास्तविक माणिक भोंग यांनी केले. डाॕ सतिश भोंग , कांतीलाल भोंग , मारुती भोंग , अंकुश भोंग , सुदाम भोंग , प्रशांत भोंग , ग्रा सदस्या अर्चना भोंग , रिना भोंग , सुगंधा भोंग , वर्षा भोंग , अर्जुन भोंग , शंकर भोंग ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू भोंग , उमेश भोंग , बाळू भोंग , सतेश भोंग , यांनी विशेष सहकार्य केले.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी केले व ॲड सुभाष भोंग यांनी आभार मानले.

