shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा सत्कार--- नंदकिशोर मुंदडा..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच माझ्यासाठी खरा सत्कार असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केले. ते आनंदगाव येथील शेतकरी भेटीदरम्यान शनिवारी बोलत होते.


विज  शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे  रोहीत्र बंद झाल्याने उभी पिके करपत होते संकटवेळी  नंदकिशोर मुंदडा यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून देण्यात आले. तात्काळ शेतकऱ्यांच्या हाकेला तात्काळ मदत झाली म्हणून शेतकरी शिवाजी गायकवाड यांच्या वतीने नंदकिशोर मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना  शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच माझ्यासाठी खरा सत्कार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमामात माजी सैनिक सुभेदार शहाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close