दिपक शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त वडार बांधवांना मोलाचा संदेश..!
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात वडार समाजाचा निर्णय स्थितीत असून तरीही राजकीय क्षेत्रामध्ये आपली ताकद दिसून येत नाही. त्यामुळे वडार समाजाव अन्याय अत्याचार वाढत असून अनेक जिल्ह्यातून तक्रार येत आहे. शिक्षण घेऊन अनेक तरुण बेरोजगार आहेत.
या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी एका मोठ्या आंदोलनाची गरज आहे. इतर समाजामध्ये अनेक संघटना असतानाही तो समाज त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र येत असतो , या प्रकारे वडार समाजाने आपल्या समाजाच्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे. समाजामध्ये अराजक परिस्थिती निर्माण झाले आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येणे काळाची गरज बनलेली आहे.
सहकार क्षेत्रांमध्ये वडार समाजाचा रोजगार हिरावून घेतला जात आहे. दगड खाण वडार समाजाच्या हिरावून घेऊन मोठ्या कंपन्यांच्या घशात घालण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. त्याचा विपरीत परिणाम येणाऱ्या पिढीवर होणार असून हा एक मोठा अन्याय आहे. त्यामुळे वेळेच वडार समाजाने जागृत व्हावे, अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
आपला नम्र
दीपक दादा शिंदे
अखिल भारतीय वडार समाज संघटना रजिस्टर
Mob 9702277100

