जानेवारी २०२२ ची व्याहाळी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक ५ फेब्रुवारी२०२२ रोजी व्याहाळी केंद्राची जानेवारी २०२२ ची शिक्षण परिषद जि प केंद्रशाळा निमगाव या ठिकाणी पार पडली.परिषदेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली नंतर केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेबांनी प्रास्ताविक केले व अध्ययन स्तर आढावा घेतला.सुलभक दत्तात्रय लकडे सरांनी प्रथम पूर्व चाचणी सोडवून घेतली नंतर अध्ययन स्तर निश्चिती,१०० दिवस वाचन अभियान यावर सविस्तर माहिती सांगितली.नंतर सुलभक राजकुमार भोंग सरांनी इंग्रजी अध्ययन समृद्धी, इंग्रजी पेटीचा वापर,रीड टू मी अँप याबाबत सविस्तर माहिती दिली.शेवटी उत्तरचाचणी सोडवून घेतली.परिषदेत सर्व १ ते ८ चे शिक्षक उपस्थित होते.आभार उपक्रमशील शिक्षक संतोष चोरमले यांनी मानले.सदर शिक्षण परिषद कोरोनाचे नियम पाळून पार पडली.*

