शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२
खडांबे खुर्द येथील झुंबरबाई हरिश्चंद्रे यांचे दुःखद निधन ; त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७:३० वाजता खडांबे खुर्द येथील देवनदीतीरी आमरधाम येथे होणार असुन ह.भ.प. भाऊसाहेब महाराज खळेकर यांचे प्रवचन होईल..!!
राहुरी : राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील प्रगतशील शेतकरी श्री दत्तात्रय हरिश्चंद्रे यांच्या मातोश्री झुंबरबाई हरिश्चंद्रे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.
त्यांच्या कुटुंबात मुलगी विजय पवार आणि दोन मुले,सुना, नातवंडे, असा एकूण परिवार आहे.
ग्राम कृषी अधिकारी अशोक पवार यांच्या त्या सासुबाई होत तर जयसिंग हरिश्चंद्रे आणि दत्तात्रय हरिश्चंद्रे यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील माजी कर्मचारी होत्या तसेच अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या असल्याने त्यांना पंचक्रोशीत अक्का या नावाने संबोधले जात.
त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०७:३० वाजता खडांबे खुर्द येथील देवनदीतीरी आमरधाम येथे होणार असुन ह.भ.प. भाऊसाहेब महाराज खळेकर यांचे प्रवचन होईल.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

