बेलापूर (अमन सय्यद) -
चांदनगर येथे काल हजरत ख्वाजा गरीब नवाज (रहे.) यांच्या छट्टी निमित्त सी.एन. बॉईज आणि के.जी.एन. ग्रुप तथा ओम साई पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने नियाज (भंडारा) चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
परिसरातील सर्वधर्मीय बांधवांनी या प्रसादाला लाभ घेतला, हजरत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिस्ती(रहे) यांचा जन्म पर्शियाच्या सिस्तान प्रदेशात ५३७ व्या हिजरी कालखंडात म्हणजेच अकराशे ११४३ इसा पूर्व झाला होता तिथून ते हिंदुस्थानात येऊन अजमेर शहरात स्थायिक झाले, उर्दू महिन्याच्या प्रथेनुसार रज्जब या महिन्याच्या ६ तारखेला त्यांचा उर्स दरवर्षी साजरा केला जात असतो, या उर्सासाठी राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ येथे भारतातील विविध ठिकाणांहून हिंदू - मुस्लिम भाविक बांधव एकत्र येऊन साजरा करतात, याप्रसंगी नियाज (अन्नदान) तसेच गोरगरिबांना उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात येते,त्याचाच एक भाग म्हणून बेलापूरच्या चांदनगर येथे नियाज(भंडारा) चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे,साहेबराव वाबळे पा.,माजी उपसरपंच रफिक दादा ,ग्रा.पं.सदस्य मुस्ताक शेख,अनिल पवार, शफिक बागवान भैय्या शेख, मोहसीन शेख, समीर जहागीरदार, जब्बार आत्तार,फिरोज सय्यद, बाबुलाल पठाण,गफ्फर सय्यद, जिना शेख, हाजी.नासीर बागवान, मुख्तार सय्यद,हुसेन सय्यद, अस्लम सय्यद, गयास पठाण व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शफिक अत्तार, असिफ शेख, माजी उपसरपंच विवेक वाबळे,सलमान तांबोळी, मोहसीन शेख,समीर शेख, तोहीद शेख,वसीम शेख, बाप्पु बोरुडे, अमीर शेख,आफताब शेख, शाहीद शेख,रफिक शेख (बॅटरीवाले),के.जी.एन. फाऊंडेशन आणि सी.एन.बॉईज, तथा ओम साई पेट्रोलियमच्या मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले.

