शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क:-
आपण जीवन जगत असतांना आयुष्यात नशिबाने चांगली माणसे आलेली असतात. परंतु कधीकधी नशिबाने आयुष्य हे वेगळ वळण घेते व आपण आपल्या मनात गैरसमझ करून घेतो. मग ज्या मानसांसोबत आयुष्य जगायला एक वेगळीच मजा येत होती आज तिच मानसं आयुष्यात नकोशी वाटायला लागतात तसेच आपल्याला त्यांच ओझं वाटायला लागतं. गैरसमझ हा लांबच्या मानसांसोबत कधिच होत नाही तो अश्या माणसांसोबत आपण गैरसमझ करून घेतो जी मानसे मनाने अगदी आपल्याजवळ आहेत. हा थोडासा करून घेतलेला गैरसमझ नात्यांमध्ये कायमचा कडवट पणा आणू शकतो.
मित्रानो, व्यक्ती कधिच चुकिचा नसतो. एखादी परिस्थितीच अशी असते की, त्यामध्ये तो व्यक्ती तसा वागलेला असतो, परंतु आपण कायमच त्या व्यक्तीला चुकिच लेबल लावुन टाकतो.
कधी कधी जास्त सहवासाने सुध्दा गैरसमझ निर्माण होऊ शकतात. कारण आपण जर एखाद्या साठी खुप जास्त उपलब्ध झालोत तर त्याला त्याची किंमत राहत नाही. एक उदाहरणच द्यायचे झाले तर,
" एका स्त्रीला चंदनाच्या झाडांचा एवढा जास्त सहवास लाभला, मग ती चंदनाची लाकडे स्वयंपाक करण्यासाठी जाळु लागली. म्हणजेच जास्त उपलब्ध झाल्यावर त्याची किंमत राहत नाही. माणसं सहसा बदलत नसतात, फक्त ती आपल्या मनासारखं वागली नाहीत तर ती आपल्याला बदलल्या सारखी वाटतात. कधी कधी आपण समझुन घेतच नाहीत आपला अहंकार आपल्याला समजून घेऊ देत नाही. मग नाते हरतात आणि आपला अहंकार जिंकतो."
सहसा आपल्याला आपली स्तुती करणारे, कौतुक करणारे, गोड- गोड बोलणारी मानसे आवडत असतात. परंतु आपल्या चुकांवर बोट ठेवनारी माणसे सहसा आवडत नाहीत. आपल्याला त्यांचा नेहमी खुप राग येतो मग ते आपल्या सोबत कितीही चांगले वागले तरीही आपल्याला त्यांचा रागच येतो. परंतु मित्रांनो, जी माणसं आपल्याला रोखठोक बोलतात त्यात त्यांचा स्वार्थ नसतो. बर्याच वेळेस स्वार्थापोटी सुध्दा लोकं स्तृती, कौतुक करतात. म्हणुनच मित्रानो, " हजार दगडं गोळा करण्यापेक्षा एकच हिरा आपल्या आयुष्यात असा ठेवा जे आपल्या आयुष्याची किंमत वाढवेल " म्हणुनच हे चेक कराव लागेल की, गैरसमजूतीने आपण कळत नकळत पणे हिरा फेकुन देऊन दगड तर गोळा करत नाहीयेत ना.
बरीच मानसं म्हणतात " मला राग येतोच " परंतु मित्रांनो राग येणं हे काय सोल्युशन थोडी आहे. आपण जर कदाचित रागावलो असलो तर माफी मागने हे सोल्युशन आहे. माफी मागने हा कमीपना नसुन आपलं मन मोठं आहे याची ती निशानी आहे. कारण तीच झाडे झुकतात ज्या झाडांना जास्त फळे लागलेली असतात. गैरसमझ करून घेऊन आयुष्यभर त्याचा त्रास सहन करण्यापेक्षा जर थोडसं समझुन घेतल तर कदाचीत थोडा त्रास होईल परंतु आयुष्यभर समाधान लाभेल.
म्हणुनच मित्रानो, आपल्या नात्यांपेक्षा अहंकाराला जास्त महत्व देऊ नका. थोडसं समझुन घ्या. बर्याच वेळेस शांत राहने हे सुध्दा बर्याच प्रश्नाचे उत्तर असु शकते. आज वेळ आहे जर आपणही चुकिचे गैरसमझ करून घेऊन बसलो आहोत अस वाटत असेल तर थोडसं समझुन घ्या, आयुष्य अगदी सुंदर होईल.
शांत डोकं ठेवून चांगले कर्म केले तर त्याचे फळही सुमधुर लाभतात.. !
त्यासाठी पैशाने श्रीमंत बनण्यापेक्षा मनाने श्रीमंत व्हा..! नाव उज्वल व अमर झाल्याशिवाय राहणार नाही..!!🙏

