शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी नगर तालुक्यातील शिंगवे नाईक या छोट्याशा गावामध्ये शिंगवे गावचे माजी सरपंच सन्माननीय विश्वासराव जाधव यांच्या पाठपुराव्याने 606 लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला. या योजनेमधील लाभार्थ्यांना प्रतिवर्षी पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व दुर्बल घटकातील लोकांना हॉस्पिटलमध्ये सहजरीत्या उपचार घेणे सोपे होणार आहे. आज या लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करून ओळखपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी गावचे माजी सरपंच विश्वासराव जाधव, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष अमोल डोळस, महेंद्र कोळपकर, शिवसेना शाखा अध्यक्ष प्रवीण जाधव, आयाज सय्यद, इंद्रभान पुंड, आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विश्वासराव जाधव व अमोल डोळस यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी भावना व्यक्त केली.

