प्रतिनिधी : किशोर चाकोते
नगर : १२ / अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी प्राचार्य पदी विजय पोकळे यांची नियुक्त झाली त्याबद्दल ग्रामीण पत्रकार संघाचे उपजिल्हाध्यक्ष शिवा म्हस्के व रफीक शेख यांनी नवनियुक्त प्राचार्य यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान केला. यावेळी ग्रामीण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
प्राचार्य श्री.विजय पोकळे हे मुळचे आष्टी तालुक्यातील चिंचाळा गावचे रहिवासी असून त्यांचे शालेय शिक्षण रेसिडेन्शिअल हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे झाले.त्यानंतर त्यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या विविध शाखामधून शिक्षक पर्यवेक्षक, प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यानंतर १ फेब्रुवारी त्यांची रेसिडेन्सशिल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अहमदनगर येथे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे साहेब, सचिव जी.डी. खानदेशे साहेब,सहसचिव अँड.विश्वासराव आठरे,खजिनदार डॉ.विवेक भापकर व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्व स्तरातून प्रा.विजय पोकळे यांचे अभिनंदन होत आहे. कोविड काळ आजुन संपलेला नाही. त्यांमुळे विद्यार्थी पालक शिक्षक यांचा सर्व मेळ घालून कामकाज करत आहे .
रेसिडेन्शिअल व ज्युनिअर काँलेज हे महाराष्ट्रातील उच्च शिखरावरील विद्यालय असुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हे आमचे ध्येय आहे.कोविड वर उपाययोजना करुन शाळा सुरू ठेवण्यासाठी पालकांसोबत समन्वय साधून आहोत.
प्रा.विजय पोकळे ( रेसिडेन्शिअल हायस्कूल काँलेज प्राचार्य अहमदनगर )

