शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२
म्हैसगांव प्राथमिक आरोग्य केंद्र खा. तनपुरे यांच्या प्रयत्नाने सुरु; राष्ट्रवादी काँग्रेसचे गागरे यांनी वेधले लक्ष..!!
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील पश्चिम दिशेला डोंगर दरीत वसलेल्या म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आज खा. प्रसादराव तनपुरे यांच्या पुढाकाराने सुरू झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, बऱ्याच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदकडून म्हैसगाव येथे दवाखाना इमारत बांधण्यात आली होती. परंतु डाॅक्टर व दवाखान्यात लागणारा आपुरा स्टॉफ असल्यामुळे दवाखाना धुळखात पडला होता. सर्व सामान्य जनतेला राहुरी, लोणी, नगर या ठिकाणी उपचार घेणे परवडत नसल्याने आपल्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय अशी सारखी चर्चा ग्रामस्थ करत असताना गावातील युवानेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव गागरे, लोकनियुक्त सरपंच महेश गागरे, नानासाहेब देशमुख, दिलीप झावरे, पत्रकार सुभाष गुलदगड, वैभव हुलूळे, गोकुळ कदम, गोपीनाथ हुलूळे यांनी खा. प्रसादराव तनपुरे यांची भेट घेऊन दवाखान्याची व्यथा त्यांच्या समोर मांडली. श्री. तनपुरे यांनी तात्काळ संबंधीत अधिकार्यांना पंचायत समिती राहुरी येथे गटविकास अधिकारी, सभापती सौ.बेबीताई सोडनर, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, उपसभापती प्रदीप पवार, सदस्य रविंद्र आढाव, सुरेशराव निमसे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. दिपाली गायकवाड, डाॅ.तांबे, डाॅ.अंजली मंडलिक व म्हैसगावातील विलासराव गागरे, ग्रामसेवक पवार भाऊसाहेब व ग्रामस्थांची बैठक बोलावून बैठकीत दवाखान्याच्या मुलभूत सुविधांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. वीज पुरवठा जोडून देण्या संबंधीत अधिकारी यांना सांगितले. पाण्याची सोय आठ दिवसात केली जाईल असे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. दवाखान्याच्या इमारतीवर देखरेख करण्यासाठी एक कर्मचारी दिला. उर्वरीत दवाखान्यात स्टाफ संबंधी श्री तनपुरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांना फोन करून दवाखान्यात स्टाफ देण्यासंबंधी चर्चा केली. लवकरच ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्फत शासनाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दवाखान्याच्या विषयी चर्चा होऊन दवाखाना सुरळीत सुरू करून इथून पुढे डाॅ तांबे, डाॅ अंजली मंडलिक, सहाय्यक कदम सिस्टर, दिघे सिस्टर, सुपरवायझर संसारे भाऊसाहेब, दिपक पिसाळ, पाठक व आशा सेविका हे सर्व नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांनी आजारी पडल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असे तनपुरे यांनी सांगितले.
यावेळी दवाखान्याविषयांची समस्यांची सोडवणूक केल्याबद्दल खा.प्रसादराव तनपुरे यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे पाटील व म्हैसगाव पंचक्रोशीच्या वतीने विलासराव गागरे पाटील यांनी केला तर डाॅ. कळसाईज, डाॅ.गवते, डाॅ.किरण खेसम्हाळकर यांनी आभार मानले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

