शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२
वैष्णवीमाताने उंचावले ग्रामिण महिलांचे जीवनमान..!!
पारनेर : दुर्गम तसेच ग्रामिण भागातील महिलांना आर्थिक सक्षम करून त्यांचे जिवनमान उंचावण्यासाठी वैष्णवीमाता महिला ग्रामिण पतसंस्थेचे विशेष योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या राणीताई लंके केले.
लंके यांनी वनकुटे येथे वैष्णवीमाता पतसंस्थेस भेट देऊन कामकामाजाची माहिती घेतली. संस्थेचा कारभार पारदर्शक असल्याचेे सांगत संस्थेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
राणीताई लंके म्हणाल्या, सामान्य जनतेला आर्थिक आधार देण्यासाठी पतसंस्था चळवळीने मोलाचे योगदान दिले. बडया बँकांकडून सामान्य नागरीकांना मदत मिळत नसताना पतसंस्थांच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना, शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते.
पतसंस्थांच्या अर्थपुरवठ्यामुळे अनेक उद्योजक तसेच शेतकऱ्यांच्या घरी समृध्दी नांदू लागलेली आहे. वैष्णवी माता पतसंस्थेने वनकुटे परिसरातील दुर्गम भागात पतसंस्था सुरू करून सामान्यांना आधार दिला आहे.
ग्रामिण महिलांना व्यवसायासाठी अर्थपुरवठा करण्यात येऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा या संस्थेने घेतलेला वसा कौतुकास्पद आहे. अल्पवधीत संस्थेला मिळालेला प्रतिसाद पाहता या संस्थेचा अल्पवधीत वटवृक्ष होेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संस्थेमार्फत महिलांच्या बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात येत असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी संस्था विशेष प्रयत्न करीत असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अॅड. स्नेहा राहूल झावरे यांनी सांगितले.
दोन मुलींवर ऑपरेशन करणाऱ्या कुटूंबाला प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येणार असून महिलांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही अॅड. झावरे यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्षा तबस्सुम फिरोज हवालदार, शारदा गणेश सांगळे, अर्चना मिनीनाथ देेशमुख, श्रामिणी संदीप चौधरी, सुनिता कानिफनाथ लोणकर, रोहिणी अर्जुन कुलकर्णी, विद्या बाळासाहेब गागरे, कामिनी मोहन शिंदे, शांता रामदास शेलार, कांताबाई बाळू पोकळे तसेच व्यवस्थापक अर्जुन कुलकर्णी, कैलास मुसळे उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

