shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एस.टी.चा अपघात सहाय्यता निधी अन्यत्र वळविण्यास प्रवासी महासंघाचा विरोध- रणजित श्रीगोड

श्रीरामपूर (शौकतभाई शेख):-  एस.टी.च्या अपघात सहाय्यता योजनेच्या ट्रस्ट मधून अधिका-यांच्या पाल्यास कल्याणकारी योजना राबविण्याचे निर्णय प्रदेश प्रवासी महासंघाचा विरोध असून याबाबत निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा राज्यभर संघर्ष उभा करणार असल्याची माहिती अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी दिली आहे.
सन २०१६ मध्ये बसमधून प्रवास करीत असताना जर प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याचे वारसदाराला १० लाख रुपये भरीव मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र स्टेट रोड अॅक्सीडेंट रिलीफ फंड (अपघात
सहाय्यता आर्थिक निधी योजना) या नावाने सह.धर्मदाय आयुक्त मुंबई यांचेकडे ट्रस्टची स्थापना केली व या ट्रस्टमध्ये राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालयातील सात वरिष्ठ अधिका-यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.



जो प्रवासी प्रवास करताना दर तिकीटामागे एक रुपया विशेष निधी घेण्याची तरतुद केली आहे. ट्रस्ट स्थापन करताना या ट्रस्टचा जो मुळ उद्देश होता त्याचे महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाने या निर्णयाचे अभिनंदन देखील केले होते, परंतु या ट्रस्टचा कारभार पारदर्शक नसल्याने परिवहन मंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या तसेच या ट्रस्टवर दोन प्रवासी प्रतिनिधीची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.

सदर जमा होणारा निधी हा प्रवासी जनतेचा विशेष निधी असल्याने व तो प्रवासी जनतेचा हक्क असल्याने सुचना केली होती.परंतू ते सत्य कारभारातील सत्य घटना बाहेर येवू नये म्हणून सुचनेची दखल घेण्यात आली नाही. परंतु आज सत्य बाहेर आल्याचे रणजित श्रीगोड यांनी सांगितले. या ट्रस्ट मधील निधीद्वारे अधिका-याच्या पाल्याचे करीता योजना राबविणे अशी घटनेत तरतूद करण्यात आली आहे. त्यास राज्यभर जनजागृती करुन संघर्ष करु असे परिवहन मंत्री ना.अॅड.अनिल परब, व्यवस्थापकिय संचालक श्री शेखर चन्ने यांना पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री यांना या कारभाराबाबत १५ सुचनांचे निवेदन देवून पारदर्शक कारभार जनतेसमोर ठेवण्यात यावा परंतू राज्य सरकारने साधी पोहच पत्र देखील दिले नाही. या संदर्भात  अकोले (जि.अहमदनगर) येथे अकोले ग्राहक पंचायत पदाधिकारी यांची नुकताच बैठक संपन्न होवून जिल्हयाचे उपाध्यक्ष सर्वश्री मच्छींद्र मंडलीक, प्रवासी महासंघाचे श्री.दत्ता शेनकर,रमेश राक्षे, रामहरी तिकांद,भाऊसाहेब बोरुडे यांनी,जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन
करण्याचा इशारा दिला आहे.

मृत व्यक्तीकरीता वसुल होणारा निधी या नविन तरतुदीला कोणी अधिकार दिला याचा खुलासा व्हावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड, महासचिव नंदकुमार कोरे (पुणे), सचिवगुरुनाथ बहीरट (पंढरपूर), यांनी  केली आहे,हा प्रकार चिड आणणारा आहे.

 जनतेत असंतोष पसरत आहे. सध्या एस टी परिवहन महामंडळ हे विविध योजना राबवित असल्याचे भासवून अनावश्यक कोटयावधी रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचा आरोप श्रीगोड यांनी केला तसेच अपघात सहाय्यता योजनेतील स्टेट बँकेतून कॅनरा बँकेत लाखो रुपये वर्ग का केले याचा खुलासा करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
close