डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीसह विविध विकास कामांचे होणार उद्या लोकार्पण
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व विविध विकासकामांचा लोकार्पण व उद्घाटनाचा सोहळा शनिवारी (दि.१२) मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीचे लोकार्पण माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संपन्न होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास मखरे व डॉ. सलीम मोमीन हे असणार आहेत.
तसेच इंदापूर नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी सूजल निर्मल पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा सकाळी साडेदहा वाजता प्रल्हाद राऊत व धनश्री धनंजय वाशिंबेकर यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.
तसेच १०० फुटी रोड येथील छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटरचा लोकार्पण सोहळा मा. निवासी नायब तहसीलदार विष्णुपंत बाब्रस व चित्तरंजन पाटील यांच्याहस्ते सकाळी अकरा वाजता संपन्न होणार असून सदरील कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा असणार आहेत.

