shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काॅंग्रेस जनविकास आघाडीचे ठरले असताना केज मधिल राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते आम्हीच शिट्टी वाजवणार- नगराध्यक्ष पदासाठी पद्दमिन शिंदे व सिताताई बनसोड ही नावे आघाडीवर..!!

स्टेटसवरती नेटकऱ्यांचा धिंगाणा  मात्र निवडी दिवसीय कळेल कोण..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-

केज नगर पंचायत निवडणूक पार पडुन निकाल लागले मात्र निकाला नंतर माजी मंत्री पंकजा मुंडे केज मध्ये आल्या आणि त्यांनी केजचा नगराध्यक्ष कमळाचाच असेल असे वक्तव्य करून राळ पेटवुन दिली .केज नगरपंचायतीचा निकाल लागल्याने व भाजपचा या नगरपंचायतीच्या निवडणूका मध्ये काही संबध नसल्याने शांत झालेले कार्यकर्ते पुन्हा पळायला लागले. या निवडणुकीत रमेश आडसकर, हारून इनामदार आणि अंकुश इंगळे यांनी मिळून जनविकास परिवर्तन आघाडी तयार केली होती या अघाडीला  आठ जागा तर राष्ट्रीय काँग्रेसला तीन जागा मिळाल्या  होत्या. प्रथमच नगरपंचायतीच्या अखाड्यात स्वतंत्र लढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाच जागा मिळाल्या  होत्या. विषेश म्हणजे शिट्टी या चिन्हावर निवडणुक लढवुन रांजणकर ह्या निवडुण अल्या . मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी नऊ सदस्यांची संख्या लागते. आघाडीला एक जागा कमी असल्यामुळे आणि त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस च्या हाताला धरून आम्ही सत्ता स्थापन करणार म्हणून जाहीर केल्यावर त्यांचे संख्याबळ ११ झाले आहे व त्यांचा हा आकडा स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त आहे. अश्यातच पत्रकार परिषद घेऊन हारूनभाई इनामदार यांनी केजच्या विकासासाठी केजच्या मातीतील आम्ही इंगळे व पाटील हे एकत्र झालो असुन पाच वर्षांकाठी आमची आघाडी असुन सौ.रजनीताई पाटील, अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आघाडी काम करेल असा सुर आवळला होता.नगराध्यक्ष हा जनविकास परिवर्तन आघाडीचाच असेल भाजपचा नाही हे पण हारूनभाई इनामदार यांनी ठणकावून सांगितले होते.                                               



ह्य सर्व घटना घडताच  राष्ट्रवादीच्या तंबूत एकदमवादळ आले व  सुरू झालं ते म्हणजे फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचे आणि निवडणूक जिंकणाऱ्या आणि पडणाऱ्यांचे स्टेटस व फेसबूकवाल वरती  वार. हे वार सुरू होत असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमचीच सत्ता येणार म्हणून ढोलकी वाजवत मिरवत आहेत.

आम्ही अनेकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक जण बोलले नाहीत तर अनेक जण म्हणाले की ज्या दिवशी निवड करण्यात येणार त्या दिवशीच  खर काय खोटे काय  हे सिद्ध होईल.  

केजच्या जनविकास आघाडीचे हारून इनामदार व माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी एकत्र येऊन आघाडीची घोषणा केली त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आदित्य पाटील व हारून इनामदार यांनी आमचे गाव आमचे सरकार चा नारा देत  हे दोन्ही नेते एकत्र आल्याची चर्चा होत आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी तर महाविकास अघाडीच्या मोठ्या नेत्यांची पत्रके तसेच आमच्याच पाठिंब्यावर केजचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष असेल हे ठामपणे सांगून केजच्या जनतेमध्ये कुतूहल निर्माण करून खळबळ माजवुन दिली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे हे कोणती जादुची कांडी वापरून केज नगरपंचायतीमध्ये सत्तासमिकरण जुळवून आणतात या कडे सर्व केजकरांचे लक्ष लागले आहे. 

आता नेमका नगरअध्यक्ष कोण होणार हे  येणारा काळ ठरवेल व कोण लबाड कोण खरं हे निवडी दिवशी कळेल हे मात्र निश्चीत.                                              

जनविकास परिवर्तन आघाडी कडून सौ.पद्दमिन गुलाबराव शिंदे व सिताताई बनसोड ही दोन नावे नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर असुन काॅंग्रेस कडुन  उपनगराध्यक्ष पदासाठी सोमनाथ गुंड हे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सौ.रांजणकर यांचे नाव आघाडीवर आहे.
close