शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२
जागतिक महिला दिनानिमित्त ‘अहमदनगर आयडॉल लेडी’ पुरस्काराचे आयोजन..!!
अहमदनगर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘माहेर ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटर प्रा.लि.’ आणि ‘सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च रोजी ‘अहमदनगर आयडॉल लेडी’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक, चित्रपट, वैद्यकीय तसेच इतर क्षेत्रातील 100 कर्तृत्वान महिलांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. सध्या विविध क्षेत्रात महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. त्यांच्याच उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून ‘अहमदनगर आयडॉल लेडी’ हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.
पाईपलाईन रोड वरील एकविरा चौकात माहेर ब्युटी पार्लर असून 100 महिला एकत्र येऊन त्यांनी हे पार्लर सुरू केले आहे. सहकारी तत्वावर सुरू असलेलं महाराष्ट्रातील हे पहिलं ब्युटी पार्लर आहे. 2 हजार स्के.फु. मध्ये सुरू असलेलं हे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठं ब्युटी पार्लर असून या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागातील महिला आणि मुलींना कमी फी मध्ये पार्लर चे विविध कोर्सेस शिकवले जातात. तसेच ब्युटी च्या सर्व छोट्या मोठ्या ट्रीटमेंट देखील या ठिकाणी सहज उपलब्ध आहेत.
महिला आणि मुलींना प्रोत्साहित करण्यासाठी महेर ब्युटी पार्लरच्या वतीने नेहमी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावेळी देखील विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याला कौतुकाची थाप देण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
या पुरस्कारासाठीचे अर्ज माहेर ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटर प्रा.ली., दुसरा मजला, एशियन फार्मसी च्या पाठीमागे, व्यंकटेश मल्टिस्टेट च्या वर, एकविरा चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर या पत्त्यावर 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत आमच्याकडे पाठवावेत, असे आवाहन माहेर ब्युटी अँड ट्रेनिंग सेंटर प्रा.लि. च्या संचालिका सौ.शुभांगी संदीप थोरात यांनी केलं आहे.
पुरस्कारासंदर्भात अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
शुभांगी थोरात – 8459239840
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

