shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनसेच्या आंदोलना नंतर सी,डी जैन कॉलेजमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असलेली जाळीचा दरवाजा काढण्यात आला.

श्रीरामपूर ।  प्रतिनिधी :-
मनसेच्या आंदोलना नंतर सी,डी जैन कॉलेजमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती असलेली जाळीचा दरवाजा काढण्यात आला.
श्रीरामपूर येथील सीडी जैन कॉलेज मध्ये गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चारी बाजूने लोखंडी जाळी च्या सहाय्याने बंदिस्त पणाने करून ठेवण्यात आली होती परंतु मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने आज दिनांक १६/२/२०२२ रोजी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांचे नेतृत्वाखाली कॉलेज मध्ये जाऊन आंदोलन करण्यात आले.

व सी,डी जैन कॉलेज प्राचार्य श्री निंबाळकर साहेब यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले
त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंची श्रद्धा स्थान आहेत त्यांचं पुतळा अशाप्रकारे कैद करून ठेवल्याने तमाम शिवप्रेमींची मन दुखावले गेले व अशाप्रकारे महाराजांचा पुतळा कैद करून अपमान करणारी घटना आम्ही कदापि सहन करणार नाही ही कॉलेज प्रशासनाने लक्षात ठेवावे महाराजांना साडेतीनशे वर्षापूर्वी मोगल साम्राज्य यांनी असेच कैद करून ठेवण्याचे प्रयत्न केले परंतु छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तावडीतून सुटले होते परंतु आज  रयत शिक्षण संस्था श्रीरामपूर सीडी जैन कॉलेज यांनी आज या ठिकाणी महाराजांचा पुतळा लोखंडी गजाने सायाने कैद करून ठेवण्यात आले ही घटना अतिशय चुकीची आहे.


या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो व आज आमच्या आंदोलनानंतर लोखंडी दरवाजा काढण्यात आला यापुढे जर पुन्हा अशा पद्धतीने गेट लावून बंद अवस्थेत ठेवण्यात आले तर कॉलेज व्यवस्थापकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले.

आंदोलन निवेदन स्वीकारताना कॉलेज व्यवस्थापन यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले की यापुढे काळामध्ये आम्ही महाराजांच्या पुतळा बंद करून ठेवणार नाही कॉलेज वेळामध्ये रोज दरवाजा उघडे करूनच ठेवण्यात येईल असे आश्वासन कॉलेज व्यवस्थापन च्या वतीने देण्यात आली.

यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी, शहर सचिव दीपक सोनवणे, तालुका उपाध्यक्ष समर्थ सोनार, शहर उपाध्यक्ष अमोल साबणे, मनोज जाधव, विभाग अध्यक्ष लक्ष्मण लोखंडे,विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष महेश रोकडे, किरण रणवरे, अतुल खरात, विकी शिंदे, रुपेश शिंदे, आर्यन शिंदे, कुंदन शेलार, रोहित वेताळ, विकी निकाळजे, जगन सुपेकर, किशोर बनसोडे, विकास शिंदे, विनेश शिंदे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close