न्याहळोद: परिसरातील तामसवाडी ता. जि. धुळे येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विभागाच्या मार्फत हरभरा पिकावरील शेतकऱ्याच्या शेती शाळेचा शेती दिन कार्यक्रम घेण्यात आला . यात हरभरा बियाणे पेरणी , पाणी व्यवस्थापन व कीटकनाशके खते यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले .
कृषी विभाग आत्मा अंतर्गत सदर कार्यक्रम हा साधारणतः 15 दिवसातून एकदा ह्या प्रमाणे एकूण 10 शेतीशाळा वर्गाच्या माध्यमातून घेण्यात आला, कार्यक्रमास निवड केलेल्या 25 शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष हरभरा पिकाचे पूर्वमशागत ते पिकाच्या काढणी पर्यंतचे तंत्रज्ञान विविध मार्गदर्शकांचे मार्फत शेती शाळेत देण्यात आले, बीजप्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, जीवामृत तयार करणे, 5% नींबोळी अर्क , दहा वनस्पती अर्क तयार करणे ह्याप्रमाणे लघु अभ्यास शेती शाळा वर्गात घेण्यात आले.
शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचे मार्गदर्शन करून कमी उत्पादन खर्च करणे बाबत मौलिक सल्ला हा प्रात्यक्षिक प्लॉट द्वारे देण्यात आला, सदर कार्यक्रम हा मंडळ कृषी अधिकारी सोनगीर ह्यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला, आजच्या कार्यक्रमात गावातील प्रगतिशील शेतकरी यांनी आपले शेतीशाळा बद्दलचे अनुभव कथन केले, तसेच श्री. शरद बोरसे यांनी देखील शेती शालेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमात श्री.आतिश पाटील सर कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्व व जमीन सुपीकता निर्देशांक नुसार खत व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, कंपोस्ट खत तयार करणेबाबत सखोल मार्गदर्शन केले, तालुका कृषी अधिकारी धुळे श्री. वाल्मीक प्रकाश सर यांनी कृषी विभागाच्या मार्फत राबविण्यात येत असलेले महाडीबीटी अभियान बाबत तसेच प्रधानमंत्री फळ व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबद्दल माहिती दिली तसेच शेती शाळेतील शेतकऱ्यांच्या सहभाग बद्दल समाधान व्यक्त केले,
सदर कार्यक्रम हा श्री. संजय देवरे कृषी पर्यवेक्षक व श्रीमती रीना देवरे तज्ञ मार्गदर्शक यांनी राबविला, तसेच आजच्या कार्यक्रम सूत्र संचालन श्री. प्रवीण डी.पवार यांनी केले, कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. राकेश परदेशी यांनी केले. सदर कार्यक्रमास श्री सतीश कोतकर, मनोज वानखेडे, अमोल बोरसे, सुरेश करहाळे, श्रीमती प्रतिभा पाटील अनिता पवार तसेच तामास्वाडी येथील प्रगतिशील व शेतीशाळा साठी निवड केलेले शेतकरी बहु संख्येने उपस्थित होते.

