पूर्णा । प्रतिनिधी :- पूर्णा शहरामध्ये 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे त्यासाठी पूर्णा नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असून प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीश कुमार यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की पूर्ण शहरांमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात असून या शिवजयंतीसाठी शहरांमध्ये संपूर्ण स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे शहरातील रस्ते साफसफाई मोहीम हाती घेतली असून शिवजयंती निमित्त सर्व भक्तांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेतला जात असूनछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्व परिसर स्वच्छ केला असून त्या ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून शहरातील नागरिकांनी प्रशासनाला व सहकार्य करून शांततेत शिवजयंती महोत्सव साजरा करावा असे असे आवाहन करण्यात आले असून दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक नगराध्यक्ष उपस्थित होते.

