shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रोडची दुरुस्ती करून द्यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न...!


औरंगाबाद । सतिश लोखंडे ( प्रतिनिधी )
कन्नड :- तालुक्यातील लोहगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी यापूर्वी सूद्धा वारंवार  रितसर निवेदन देऊन त्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्यात येत होती.

शेवटी नाईलाजाने २५ फेब्रुवारी रोजी     जिल्हा परिषद शाळा लोहगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्यात येणार होते पण पिशोर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष बीट जमादार डकले साहेब यांनी सावधगिरी बाळगुन त्यांना पकडले आणि त्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न हानुन पाडला . !
काही वेळातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे साहेब हे उपस्थित झाले आणि याविषयी चर्चा करून येत्या आठ दिवसांत ठप्पा ठप्याने लवकरच काम चालू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.यावेळी नवाब शेठ , कैलास जाधव व असंख्य लोहगावतील नागरिक उपस्थित होते.
close