shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक विज्ञान दिनानिमित्त ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विज्ञान प्रदर्शन आयोजित...!


पुणे- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि डोअर स्टेप स्कूल यांच्या माध्यमांतून आपले जवळपास एकूण 3 शाखा मोफत क्लासेस सुरू आहेत.

त्यातील हे पहिल्या क्लासच्या मुलांनी उत्कृष्ट विज्ञान प्रदर्शन आयोजित केल आहे, जागतिक विज्ञान दिन हा 28 तारखेला आहे त्या निमित्ताने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे ते साई विस्टा या नावाचे ग्रुप प्रकल्पाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी लेबर कॅम्प मधील बांधकाम मजूर करणाऱ्या त्यांच्या मुलांच्यासाठी मोफत स्कूलचा आयोजन आणि शिक्षणापासून वंचित राहू नये करिता त्या ठिकाणी क्लास सुरू आहे, त्या मुलांनी कामगार बंधूंच्या मुलांनी उत्कृष्ट अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आले,

या पाठीमागचे उद्दिष्ट म्हणजे कि शिक्षणासोबतच शारीरिक मानसिक आणि मेंदूचे चांगल्या प्रकारे अभ्यास आणि नवीन काहीतरी शिकण्यास मुलांना मिळावे याकरिता या प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं तर तेथील सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मन भरून कौतुक करून तेवढे कमीच आहे धन्यवाद.. आणि यावेळेस ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अमित दादा जगताप यांनी सर्व शिक्षकांचे आणि आयोजकांचे फोनवरून त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन केले.

यावेळेस राकेश हरिभाऊ नखाते यांच्या हस्ते रेबिन कापून प्रदर्शनास सुरूवात केली, सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ नखाते त्याचप्रमाणे संजय तात्या गोडांबे, मिलिंद थोरात, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, पै.संतोष भाऊ चांदेरे हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
close