shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊसाने भरलेली बैलगाडी घसरल्याने चारीच्या पाण्यात बुडून बैलाचा मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२

ऊसाने भरलेली बैलगाडी घसरल्याने चारीच्या पाण्यात बुडून बैलाचा मृत्यू..!!
  

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील भेंडा-जेऊर रस्तावरील गरडवस्ती जवळ बुधवारी रात्री 8:30 वाजता ऊसाने भरलेली बैलगाडी घसरल्याने चारीच्या पाण्यात बुडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की,सध्या मुळा उजवा कालव्याच्याचे आवर्तन सुरू आहे. कालव्याचे पाण्याने बंधारे भरण्यासाठी रस्त्यावरून पाणी सोडल्याने बुधवार दि.16 रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान ज्ञानेश्वर कारखान्यास ऊस वाहतूक करणारे
शिवाजी गणपत हंडाळ रा.पाचुंदा,ता.नेवासा या ऊसतोडणी कामगाराची ऊसाने भरलेली टायरबैल गाडी रस्तावरील पाण्यामुळे घसरून गाडी चारीत पडली.त्यामुळे एक बैल चारीच्या पाण्यात दबून जागीच गतप्राण झाला. कारखान्याकडे ऊस घेऊन आठ ते दहा टायर बैलगाड्या चालल्या असता एक टायरगाडी घसरुन चरात गेली,चरातील पाण्यात बैल दबला गेला. त्याला मोकळा करेपर्यंत अवघ्या 3-4 मिनिटात बैल गतप्राण झाला.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close