शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२
गुहा शिवारात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह..!!
अहमदनगर : पिंपळगाव फुणगी शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका ४० वर्ष वयाच्या अनोळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे वाटसरूंनी पाहिले. स्थानिक नागरीकांनी पाहिल्या नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
गुहा - पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजवा कालव्यातुन रोटेशन सुरु असुन सदर महिलेचे प्रेत या ठिकाणी कसे आले? पाण्याच्या प्रवाहात वाहत आले की कसे? बुधवारी दुपारी स्थानिक नागरीकांनी पाण्यावर तरंगत असलेले महिलेचे प्रेत पाहिले. येथिल पोलिस पाटील व सरपंच यांना या प्रेताबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती कळवली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी यांच्यासह सहायक फौजदार एन. आर. शिंदे, पो.हे.काँ. लक्ष्मण बोडखे यांनी धाव घेतली.
प्रवरा उजव्या कालव्यातील पाण्यावर तरंगत असलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढला असता मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. याकामी गुहाचे उपसरपंच रामा बर्डे, साई प्रतिष्ठाण रुग्णवाहीकेचे चालक रविंद्र देवगिरे तसेच स्थानिक गावकरी यांनी मदत केली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

