shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरूजी आम्हांला शिक्षण देण्यासाठी थोड लवकर येता का ?..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२


गुरूजी आम्हांला शिक्षण देण्यासाठी थोड लवकर येता का ?..!!

◾मुरमा येथील जि.प.शाळेतील शिक्षकांना वेळेचा विसर..

पैठण (पाचोड) : मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. नेमके कोरोनाची संख्या आटोक्यात आली असल्याने पहिली ते सातवीचे वर्ग भरण्याची परवानगी सरकारने दिली आहे. मात्र मुरमा (ता.पैठण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक रोज उशीरा येत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
गेल्या आठवड्यापासून या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी पाठपुरवा केला असता रोज शाळेत किती शिक्षक येतात किती वाजता शाळा भरते हे पाहीलं. यातून असं दिसून आले की, काही शिक्षक दहा वाजता शाळेत हजर होतात, तर काही दुपारी घरी निघून जातात. यावरुन या शाळेतील शिक्षकांना वेळेचा विसर पडला की काय असे दिसून येते. उशीरा येणाऱ्या शिक्षकांवर कुणाचाच अंकुश नसल्याने नसल्यामुळे हे असले प्रकार घडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे. सोमवारी शाळेचे ९ वाजून ४५ मिनीटाला गेट बंद होते. मंगळवारी यावेळेला शाळेत कोणीच हजर नव्हते. बुधवारी ९ वाजून ४८ मिनिटाला चार शिक्षक हजर होऊन परिपाठ सुरू होता. त्यामुळे नेमकी शाळा भरते कधी हेच कळायला मार्ग नाही. शाळेला काही टाइमटेबल आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शाळेतील शिक्षक पाचोड सारख्या ठिकाणी हॉटेलमध्ये गप्पा मारत बसत असल्याचे आढळून आले आहेत. कोरोना काळात ही या शाळेतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास घेतले नसल्याची खंतही पालंकांतून व्यक्त होत आहे.

शिक्षणाधिकारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामभरोसे सुरू आहे. प्रभारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील शाळेवर लक्ष देण्याची गरज.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 

close