shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेल इंदापूर तालुका युवक अध्यक्ष पदी खोरीची येथील भाऊसाहेब वाकसे व तालुका उपाध्यक्ष पदी न्हावी येथील सतीश मारकड यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेल इंदापूर तालुका युवक अध्यक्ष पदी खोरीची येथील भाऊसाहेब वाकसे व तालुका उपाध्यक्ष पदी न्हावी येथील सतीश मारकड  यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर  यांच्या हस्ते निवडीचे  दिले पत्र.
इंदापूर प्रतिनिधी: खोरोची येथील भाऊसाहेब उमेश वाकसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती सेल च्या इंदापूर तालुका युवक अध्यक्ष पदी व तालुका उपाध्यक्ष पदी न्हावी येथील सतीश नामदेव मारकड यांचे नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस चे भटक्या विमुक्त जाती जमाती सेल इंदापूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांनी त्यांची निवड केली असून सदर निवडीचे पत्र पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर,
 इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या हस्ते इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात  दि. ११ फेब्रुवारी२०२२ रोजी देण्यात आले. 
यावेळी   प्रशांत पाटील ,अभिजीत तांबिले ,हनुमंत बंडगर,बाळासाहेब करगळ ,नवनाथ रुपनवर,सागर मिसाळ , शुभम निंबाळकर, शिवाजी पानसरे,बाळासाहेब ढवळे,विठ्ठल ननवरे ,धनंजय बाब्रस, सचिन खामगळ,रमेश पाटील ,  विजय शिंदे, तानाजी हंगे ,कालिदास देवकर,सागर व्यवहारे ,सोमनाथ पवार ,सुरेश दरदरे ,संतोष शिंदे, नाथा चौगुले ,नितीन शिंदे ,गणेश वाघमोडे,महेश काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रियाताई सुळे ,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व भटक्या विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व भटक्या विमुक्त जाती जमाती सेल चे कार्य व ध्येयधोरण लोकांपर्यंत पोचवणे व सार्वजनिक कामांमध्ये भाग घेऊन लोकांना मदत करणे .तसेच पक्ष संघटना मजबूत करून पक्ष बांधणीचे काम करण्यासाठी भाऊसाहेब वाकसे खोरोची युवक अध्यक्ष सेल पदी व  सतीश नामदेव मारकड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे  अण्णासाहेब धोत्रे यांनी यावेळी सांगितले.
close