विज बिल दुरुस्ती व वाढलेली एच.पी. कमी करून अद्यावत बिले द्या - नितीन शिंदे
शिवसेना तालुका प्रमुख इंदापूर नितीन शिंदे यांची निवेदन पत्र महावितरणचे उपकार्यकारी अभियंता इंदापूर यांच्याकडे सुपूर्त.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील विज बिल न भरल्याने विद्युत वितरण कंपनी सध्या शेतकर्यांचे वीज जोड तोड करीत आहे. परंतु आज दिनांक ११ फेब्रुवारी रोजी इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख इंदापूर यांनी उपकार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण इंदापूर यांना इंदापूर तालुक्यातील विज बिल दुरुस्ती व वाढलेली एच.पी. कमी करून अद्यावत बिल देण्यासंदर्भात निवेदन पत्र सह मागणी केली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, उपजिल्हाप्रमुख संजय काळे, इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी, माजी तालुकाप्रमुख योगेश कणसे, तालुका समन्वयक अरुण पवार, तालुका संघटक सुदर्शन रणवरे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
या निवेदन पत्रात नमूद केले आहे की, जगामध्ये कोरोना ने थैमान घातले आहे. त्यामुळे सामान्य जनता शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सगळीकडे वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू आहे .त्यामुळे ज्या लोकांनी पैसे भरले आहेत किंवा पूर्वीपासून नियमित पैसे भरत आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा वीज मिळत नाही. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचे व पिण्याच्या पाण्याची फार मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या डी.पी .वरील काही शेतकरी पैसे भरण्यास तयार असतात तरी काही थोडेफार पैसे भरू शकत नाहीत. ्याठिकाणी शेतकर्यांमध्ये वाद निर्माण होऊ लागली आहे. शिवाय आपण एकट्याने पैसे भरून आपल्याला वीज मिळत नाही म्हणून काही शेतकरी पैसे भरायचे थांबले आहेत. तसेच डी.पी. सोडवल्यामुळे डी.पी. वरून वाड्या-वस्त्या वरती वीज कनेक्शन आहे .डी.पी. बंद झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले जे घरगुती ग्राहक नियमित वीज बिल भरणा करत असूनही त्यांना वीज मिळत नाही. त्यामुळे लोकांमध्ये महावितरण कंपनीच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अशाप्रकारच्या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यास सर्रास वाढीव बिल आकारले आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ५ एच.पी मोटर आहे. त्या शेतकऱ्याला १० एच.पी चे बिल आले आहे. अशी सर्व अवाच्या सव्वा आलेली बिले व एच.पी. गावा-गावात कॅम्प घेऊन त्वरित दुरुस्त करून मिळावी व होणारी अडवणूक पिळवणूक त्वरित थांबून सर्व शेतकरी वर्गाला सहकार्य करावे अन्यथा आपल्या महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात वेगळा मार्ग अवलंबावा लागेल यासंदर्भात नोंद घेण्याचे पत्र उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे महावितरण कार्यालयासमोर देण्यात आले.
वाढीव वीज बिल दुरुस्ती व एच. पी. संदर्भात दुरुस्तीचे कार्य चालू असूनही लवकरच गावोगावी कॅम्प लावून दुरुस्ती व अडचणी संदर्भातील प्रश्न मार्गी लावू तसेच महावितरण वर कर्जाचा बोजा असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे थकीत बिल आहे त्यांनी विज बिल भरून सहकार्य करावे असे इंदापूर उपकार्यकारी अभियंता रघुनाथ गोफने यांनी सांगितले.

