शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२
विद्यार्थिनींना मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा : डॉ. अनुराधा खेमनर..!!
संगमनेर : देशाचे भवितव्य तरुणींच्या हातात आहे. विविध क्षेत्रात पुढे जावे त्यासाठी तरुणींने मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नियमित संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. तसेच व्यायामाला सुद्धा महत्त्व देणे आवश्यक आहे. आरोग्याच्या समस्या जर जाणवले तर तात्काळ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या असे प्रतिपादन डॉ. अनुराधा खेमनर यांनी केले.
त्या संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रमेश फिरोदिया कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळाने आयोजित केलेल्या "निर्भया कन्या अभियान" अंतर्गत तीन दिवसीय कार्यशाळेत महिलांचे आरोग्य या विषयावर बोलत होत्या.
प्राचार्य डॉ. सचिन घोलप म्हणाले, विद्यार्थिनींचे आरोग्य चांगले असेल तर चांगला अभ्यास त्या करू शकेल, चांगले करिअर घडवू शकतील. त्यासाठी मुलींनी आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे.
विद्यार्थी विकास मंडळाचे कार्यक्रम अधिकारी प्रा रंजित गिरी यांनी या अभियाना विषयी माहिती दिली.
याप्रसंगी पत्रकार किरण पुरी, प्रा. कल्पना शेळके, प्रा. प्राची भोर, प्रा.एम.टी.खेमनर, प्रा.गणेश कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय आसवले, प्रा.योगेश साळुंखे, प्रा.पोपट खेमनर, प्रा. राजेंद्र हिंगे, प्रा. सोनाली मुनतोडे, प्रा. स्नेहल भागवत, प्रा. आरती डोळझाके, प्रा. प्राजक्ता बिडवे, प्रा.प्रतीक्षा वाघुंडे, प्रा. श्रीकांत वाकचौरे, प्रा. गणेश साळुंके, प्रा. आरती शिंदे, प्रा. जया राशिनकर, प्रा. शंकर राशीनकर, प्रा. बाळासाहेब सोनवणे, पाराजी खेमनर, मनोहर दुरगुडे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व महिला पालक, विद्यार्थ्यांनी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कल्पना शेळके यांनी तर सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता बिडवे यांनी केले व आभार प्रा आरती शिंदे यांनी मानले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

