शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२
बेलापूररोड वरील “ते” टोलेजंग,डेरेदार वडाचे झाड तोडू नका..!!
श्रीरामपूर : श्रीरामपूर ते बेलापूर रस्त्यावर असणारे एक टोलेजंग वडाचे झाड या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे तोडले जाणार असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.परंतु शतकानुशतकांपासून श्रीरामपूर व बेलापूर परिसरातील नागरिकांच्या मनातील लँडमार्क असलेले हे वडाचे झाड तोडू नये अशी मागणी होत आहे. कारण अनेक शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार हे वडाचे झाड आहे.तसेच वटसावित्रीला अनेक पिढ्यातील महिला या वडाची पुजा करायला वटपौर्णिमेच्या कार्यक्रमाला येत असतात.या वडा जवळ झालेले अपघात देखील अनेकांच्या स्मरणात आहे.
त्यामुळे हे ऐतिहासिक वडाचे झाड तोडू नये अशी मागणी नागरिकांसह राजकीय नेते मंडळी देखील करीत आहेत.या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती समजते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

