shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊसाने भरलेली बैलगाडी पलटी,बैलगाडी चालकासह बैल गंभीर जखमी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२
 
ऊसाने भरलेली बैलगाडी पलटी,बैलगाडी चालकासह बैल गंभीर जखमी..!!

अहमदनगर : ऊस वाहतूक करणारी बैलगाडी (टायर) खराब रस्त्यामुळे पलटी झाल्याची दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यातील अंतरवाली बुद्रुक या गावातील चापडगाव रस्त्यावर घडली. या घटनेत बैल गंभीर जखमी झाला असून बैलगाडी चालक देखील जखमी झाला आहे. सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारी बैलगाडी ही अंतरवाली बुद्रुक या गावापासून केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जात होती. या वेळी अंतरवाली बुद्रुक ते चापडगाव हा रस्ता कच्चा असल्यामुळे आणि या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे असल्यामुळे उसाने भरलेली बैलगाडी अचानक पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटनेत बैल गंभीर जखमी झाला असून बैलगाडी चालक अमोल कुंडलिक ठोंबरे (वय, 23) जखमी झाला आहे. ही घटना (दि.१९) सकाळी ११ च्या दरम्यान घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, गाडीतील ऊस व गाडी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठ्या खड्ड्यामध्ये बैलगाडी बैलाच्या अंगावर कोसळल्याने बैल गंभीर जखमी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी मदत करत जखमी बैलांना बाहेर काढले.

मात्र या घटनेच्या निमित्ताने रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अंतरवाली बुद्रुक ते चापडगाव हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून खड्डेमय आहे. तरीही या रस्त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, तसेच राजकीय नेत्यांचे देखील लक्ष नसल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. राजकीय नेते मंडळी फक्त मतदान माघण्यासाठी गावात येऊन रस्त्याचे आश्वासन देतात. मात्र प्रत्येक्षात काहीच काम होत नाही अशी परिस्थिती असल्याने या भागातील ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यामुळे अशा अपघाताच्या होणाऱ्या घटनेला नेमकं जबाबदार कोण.? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close