शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२२
नाभिक महामंडळ व संत सेना नाभिक समाजाच्या वतीने गुगल बॉय शौर्य सस्करचा सत्कार..!!
अहमदनगर : नाभिक महामंडळ आणि संत सेना नाभिक समाजाच्या वतीने मोरगे वस्ती परिसरात राहणारा सुप्रसिद्ध गुगल बॉय "शौर्य सस्कर" चा सत्कार करण्यात आला.
गुगलबॉय शौर्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्याच्या नाभिक संघटनेच्या वतीने हा सत्कार करण्यात आला. शौर्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ज्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देऊन आपले नाव नोंदवले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच त्याला ज्ञात असलेले पिरॉडिक टेबल, विज्ञानातील शोध, सर्व राज्यांच्या राजधान्या, भारता शेजारील देश, त्याच बरोबर त्याला येत असणारे संपूर्ण माहिती आलेल्या मान्यवरांसमोर सादर करत उपस्थितांना अचंबित केले. यावेळी शौर्य चे आजोबा व जयहिंद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक विठ्ठलराव सस्कर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी नाभिक महामंडळाचे कैलास भागवत, बाळासाहेब वाकचौरे, चंद्रशेखर वाघ, सुभाष महाले, संतोष वाघ, पोपटराव वाकचौरे, पांडुरंग वाघमारे, सचिन खजिनकर, कृष्णा जाधव, विजय निकम, जरहाड मामा, संजय शेलार, मोरगे वस्ती परिसरातील राजवळ साहेब, गोरे सर, शकूरभाई शेख, बाबासाहेब खोसरे, बोलके गुरुजी, श्रावण पाटील, संजय परदेशी, नाभिक समाजाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. आलेल्या उपस्थितांचे जय हिंद अकॅडमीचेचे संचालक सुयोग सस्कर यांनी आभार मानले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

