shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर नगरपरिषदेचा रु . १०७ कोटी रकमेचा अर्थसंकल्प मंजूर

इंदापूर नगरपरिषदेचा रु . १०७ कोटी रकमेचा अर्थसंकल्प मंजूर 

इंदापूर नगरपरिषदेचे सन २०२२-२३ या वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा

 (दि.१४) रोजी ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न 
इंदापूर  प्रतिनीधी:इंदापूर नगरपरिषदेचा रु . १०७ कोटी रकमेचा अर्थसंकल्प मंजूर ,इंदापूर नगरपरिषदेचे सन २०२२-२३ या वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा (दि.१४) रोजी ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न 
झाली . सभेच्या अध्यक्षस्थांनी  सौ . अंकिता मुकुंद शहा नगराध्यक्ष इंदापूर नगरपरिषद हे होत्या. स


न २०२२-२३ चा कोणतीही कर वाढ नसलेला रक्कम रुपये ४.४३.५५४ रु. शिल्लकेचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला . यामध्ये मागिल वर्षाची शिल्लक रु .१,२३,८८,१८७ -असून सन २०२२-२४ मध्ये अंदाजे महसूली व भांडवली जमा रु .१०६,४६,६६'९२५ - अपेक्षित धरणेत आलेली आहे . तसेच महसूली खर्च व भांडवली खर्च रुपये १०७,६६,११,५५८- अपेक्षित धरण्यात आलेला आहे . 

त्यानुसार सभेमध्ये खालीलप्रमाणे अर्थसंकल्पाबाबत चर्चा करणेत आली . सदर अंदाजपत्रकात इंदापूर शहराच्या विविध विकास कामाकरिता पुढील योजना प्रस्तावित आहे . १ ) इंदापूर नगरपरिषद जुन्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी स्थलांतरित होणार असल्याने इंदापुर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या जाग्यावर मल्टीपर्पज पार्क ( यामध्ये Sunday Market , Entertainments . Shopping Complex and ZP School ) विकसित करणे प्रस्तावित आहे या कामासाठी १०० कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील १५ कोटी खर्च करणे प्रस्तावित आहे .

 २ ) इंदापूर शहरामध्ये क्रिकेट स्टेडीयम व स्विमिंग पूल करणे या कामासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील ५ कोटी खर्च करणे प्रस्तावित केला आहे .३) इंदापूरशहर मध्ये मंडई बाजार साठी बाजार ओटे बांधकाम करणे प्रस्तावित आहे . ४) संपूर्ण इंदापूर शहरामध्ये महाराष्ट्र नगरोत्थान योजने अंतर्गत भुयारी गटर करणेसाठी 05 कोटी चे काम असून प्राथमिक अवस्थेतील खर्च प्रस्तापित आहे ५ ) नगरपरिषद कर्मचाऱ्यांची थकीत पगार देणी तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शॉपिंग सेंटर येथील लिलाव उत्पन्न राखीव ठेवण्याचे ठरविण्यात आले.

तसेच पुढील विविध योजनामधील खर्च प्रस्तावित आहे १५ वा वित्त आयोग १.६० कोटी अल्पसंख्यांक अनुदान १०लाख महाराष्ट्र नगरोत्थान योजना १० कोटी रस्ता व विशेष रस्ता अनुदान ३.७० कोटी सुजल निर्मल अभियान ५० लाख नागरी दलित वस्ती योजना २.५ कोटी वैशिष्टपूर्ण योजना २५ कोटीनागरी दलितेतर योजना २ कोटी स्थानिक विकास निधी व खासदार फंड  ५० लाख अग्निशमन योजना १० लाख स्वच्छ भारत अभियान १० कोटी प्रधानमंत्री आवास योजना २ कोटी सदर सभेमध्ये नगराध्यक्ष म सौ . अंकिता मुकुंद शहा तसेच उपनगराध्यक्ष , सर्व विभागाचे सभापती सर्व मान्यवर नगरसेवक व नगरसेविका यांनी उपस्थित राहून सदर सभेच्या चर्चेत सहभाग घेतला . 

सभेस सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते . सभेचे कामकाज संपल्यानंतर नगराध्यक्षा सौ . अंकिता मुकुंद शहा यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करुन सर्वांचे आभार मानले .

close