शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२
कोल्हार परिसरातील जनता हॉटेल जवळ LCB ने ०६ गावठी कट्टे पकडले..!!
कोल्हार : कोल्हार गाव शिवारातील नगर -मनमाड रोड वर असणाऱ्या हॉटेल जनता जवळ स्थानिक गुन्हे शाखेचे(LCB) पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शना खालील पथकाने आरोपी ऋषिकेश घारे ,राहणार -पारेगाव,संगमनेर व सोमनाथ सांगळे,राहणार -चिंचोली गुरव,संगमनेर यांना ताब्यात घेतले.त्यावेळी त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे एकूण सहा गावठी कट्टे व बारा जिवंत काडतूस असा जवळपास 01 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार मनोहर गोसावी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर लोणी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री.डॉक्टर बी.जी.शेखर पाटील ,श्री मनोज पाटील ,पोलीस अधीक्षक नगर, श्री.सौरभ कुमार अग्रवाल ,अप्पर पोलिस अधिक्षक नगर ,श्रीमती स्वाती भोर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, श्री.संजय सातव, डीवायएसपी शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे ,पोलीस हवालदार- मनोहर गोसावी ,दत्तात्रय गव्हाणे, भाऊसाहेब कुरूंद, संदीप घोडके, विश्वास बेरड, पोलीस नाईक- ज्ञानेश्वर शिंदे ,विजय ठोंबरे ,शंकर चौधरी ,रवीकिरण सोनटक्के,दीपक शिंदे ,लक्ष्मण खोकले, पोलीस शिपाई-सागर ससाने ,रवींद्र घुंगासे,आकाश काळे व चालक पोलीस हवालदार संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

