शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२२
...तर ‘ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे’ होऊ देणार नाही-
खा.डॉ. सुजय विखे : शेतकर्यांना भूसंपदनाचा वाढीव मोबदला मिळावा..!!
अहमदनगर : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे’ या महामार्गासाठी शेतकर्यांच्या जमिनी घेतल्या जात आहे. त्यांच्या जमिनीचा वाढीव मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. तुम्ही शेतकर्यांची लुट करू शकत नाही. जर शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही तर मी हा ‘ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे’ होऊ देणार नसल्याची भूमिका खा. डॉ. सुजय विखे यांनी घेतली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दिशा समितीची बैठक खा. डॉ. विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी ‘ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे’ विषयी भूमिका स्पष्ट केली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते. प्रास्तविकात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिशा समितीमधील सुमारे 50 योजनांचा आढावा घेत माहिती दिली. बहुचर्चित ‘ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे’ च्या भूसंपादनाचा विषय रेकॉडवर घेण्याची मागणी खा. डॉ. विखे यांनी केली.
डॉ. विखे म्हणाले, शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला पाहिजे. यापूर्वीचे जिल्ह्यात जे महामार्ग झाले त्यामध्ये ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या त्यांना नुकसान भरपाई गुणाकार पध्दतीने मिळाली आहे. ‘ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे’ चे भूसंपादन करतानाही शेतकर्यांना वाढीव मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे पत्र व्यवहार करावा, अशी भूमिका खा. डॉ. विखे यांनी घेतली. जिल्हा कृषी विभागाकडून भूसंपदनासंदर्भात सर्व्हे केला जात असून त्यांनी हा सर्व्हे करताना शेतकर्यांचे भले कसे होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी डॉ. विखे यांनी केली.
नगर- करमळा महामार्गावरील शेतकर्यांच्या पाईपलाईन तुटून नुकसान होत आहे. याची नुकसान भरपाई त्यांना देण्याची मागणी बैठकीत मंजूर करण्यात आली. नगर शहरातील डीएसपी चौक क्रॉस करण्यासाठी 16 कोटी रूपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याची माहिती खा. डॉ. विखे यांनी बैठकीत दिली. नागापूर एमआयडीसीतील निंबळक बायपास चौकात वाहतुक कोंडी होत असते, त्या ठिकाणी सिंग्नल मंजुर करण्याची मागणी बैठकीत घेण्यात आली.
दरम्यान दिशा समितीचे अध्यक्ष असलेले खा. सदाशिव लोखंडे या बैठकीला उपस्थित नसल्याने सह. अध्यक्ष असलेले खा. डॉ. विखे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात दोन दिशा समिती असाव्यात अशी मागणी डॉ. विखे यांनी यावेळी केली. जिल्हा प्रशासनाने तसे सरकारला कळवावे, असे त्यांनी सांगितले. दिशा समितीच्या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक, प्रधानमंत्री आवास योजनेचे अधिकारी गैरहजर राहिल्याने सह. अध्यक्ष खा. डॉ. विखे संतापले. त्यांनी कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी गैरहजर अधिकार्यांना नोटीस काढणार असल्याचे सांगितले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

