shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून गांडूळ खत निर्मिती करा- अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२

व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून गांडूळ खत निर्मिती करा- अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ..!!

राहुरी विद्यापीठ : व्यवसाय करतांना गुणवत्ता जपणे अत्यंत महत्वाचे आहे. व्यवसायाकडे व्यवसाय म्हणुन पहा व रोजगार निर्मिती करा. व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून गांडूळ खत निर्मिती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पदव्युत्तर महाविद्यालयातील कृषि विस्तार व सज्ञांपन विभागाच्या वतीने शाश्वत उत्पादन व उत्पन्न वृध्दीसाठी गांडूळखत निर्मिती या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. रसाळ बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे उपस्थित होते. 
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना डॉ. अहिरे म्हणाले की कौशल्याचा धागा पकडून प्रगती केली पाहिजे. सेंद्रिय अन्न निर्मितीसाठी गांडूळखताचा वापर करणे गरजेचे आहे. गांडूळखत निर्मिती करुन उद्योजक बना असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात डॉ. संदिप लांडगे यांनी गांडूळ खत निर्मिती यावर मार्गदर्शन केले. डॉ. महेंद्र मोटे यांनी गांडूळ खत कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिक दाखविले. 
या प्रशिक्षणासाठी राहुरी तालुक्यातील डिग्रस, गोटुंबे आखाडा, सडे, बाभुळगाव या गावातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व गांडूळ खताच्या बेडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. ज्ञानदेव फराटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. मनोहर धादवड, श्री. राजु राठोड, श्री. विश्वनाथ तोंडे व श्री. अनिल येवले यांनी विशेष परिश्रम घेतले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close