शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२
हरित हायड्रोजनमुळे साखर कारखान्यांना येणार अच्छे दिन; केंद्राचे नवे धोरण पथ्यावर || भविष्यातील इंधनाला पर्याय..!!
अहमदनगर : केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी हरित हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांना मोठा आर्थिक फायदा होणार असून हे हरित हायड्रोजन जगाचे म्हणून समोर येणार आहे. यामुळे केंद्र शासनाने जाहीर केलेले धोरण हे साखर कारखान्यांसाठी वरदान ठरणार आहे.
हरित हायड्रोजन व हरित अमोनिया पर्यावरणपुरक असल्यामुळे उत्पादनांसाठी काही सवलती केंद्राने देखील जाहीर केल्या आहेत. साखर उद्योगातून या धोरणाचे स्वागत करण्यात आलेले असून सध्या राज्यातील साखर कारखाने बगॅस आधारित किंवा बगॅस जाळून वाफेवर आधारित असलेल्या सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू केलेले आहेत. या कारखान्यांमध्ये शाश्वत वायू इंधन ज्याला सस्टेनेबल एनर्जी याचा वापर वाढणार आहे. हरित हायड्रोजन धोरणामुळे सहवीजनिर्मितीला अधिक बळ मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणात इंधन उपलब्ध होणार असल्याने या धोरणाचा विशेष फायदा कारखान्यांना घेता येणे शक्य होणार आहे.
नव्या हरित धोरणामुळे सध्याच्या प्रदूर्षणकारक जीवाष्म इंधनाला पर्यावरणपुरक पर्याय म्हणून हायड्रोजन वायूचा वापर शक्य आहे. जगात वाहतूक, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रात या वायूचा वापर होत असून त्यातून वायूचे उत्सर्जन टाळले जात आहे. या वायूचे ज्वलन होताना वातावरणात घातक असणारा कार्बनडाय ऑक्साईड फेकला जात नाही. त्यामुळे हरित हायड्रोजन हा सौर, पवन यासारख्या अपारंपरिक ऊर्जेसारखा काम करतो. साधारणपणे जगामध्ये 2050 पर्यंत हरित हायड्रोजनचा वापर 18 ते 20 टक्क्यापर्यंत होणार आहे. या निर्मितीतून साधारणपणे 30 दशलक्ष रोजगार तयार होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात या वायूच्या वापराला सुरुवात झाली असून 2020 मध्ये साधारणपणे सात ते दहा लाख टन वायू वापरला गेला आहे. पारंपारिक इंधनात रसायन जाळून विद्यूत शक्ती तयार केली जाते. मात्र, हायड्रोजन वायू ऑक्सिजनच्या मदतीने विद्युत शक्ती व बाष्प शक्ती तयार करतो. आधी समुद्राचे पाणी शुद्ध करायचे त्यानंतर सौर किंवा पवन ऊर्जेतून तयार झालेल्या विजेच्या करंटद्वारे पाण्याला विद्युत करंट द्यायचा, यामुळे या हायड्रोजन व ऑक्सिजनचे विलगीकरण करता येईल. एलेक्ट्रोलिसिस तंत्रातून हे करता येते. त्यामुळे हायड्रोजनचा औद्योगिक कामासाठी इंधन म्हणून वापरला केला जाईल आणि याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा साखर कारखान्यांला होणार आहे. सध्याच्या इथेनॉल धोरणामुळे अतिरिक्त साखर इथेनॉलमध्ये डायव्हर्ट करता आली. त्यामुळे इथेनॉलच्या रुपाने साखर कारखांनदारीला अच्छे दिन आलेले आहेत. भविष्यात हरित हायड्रोजनमुळे साखर कारखान्यांची भरभराट शक्य आहे.
"दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने दिवसांपूर्वी हरित हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. भारतात हरित हायड्रोजन वायूच्या वापरायला सुरुवात झाली असून 2020 मध्ये साधारणपणे सात ते दहा लाख टन वायू वापरला गेला आहे. इथेनॉलच्या रुपाने साखर कारखांनदारीला अच्छे दिन आलेले आहेत. भविष्यात हरित हायड्रोजनमुळे साखर कारखान्यांची भरभराट शक्य आहे."
- अनंत निकम, साखर उद्योग अभ्यासक, पुणे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

