shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'जय भवानी, जय शिवाजी' जयघोषाने दुमदुमले शहर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२

'जय भवानी, जय शिवाजी' जयघोषाने दुमदुमले शहर..!!


अहमदनगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आज शहरात जल्लोषात साजरा होत आहे. विविध संघटनांनी महाराजांना अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषाने शहरातील अनेक परिसर दुमदुमले होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आज शहरात जल्लोषात साजरा होत आहे. विविध संघटनांनी महाराजांना अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषाने शहरातील अनेक परिसर दुमदुमले होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बस स्टॅन्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचे हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप , जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील , उपमहापौर गणेश भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, मनपा आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते.

नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जनसेवेसाठी झटण्याचा संकल्प करण्यात आला.

शिवजयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पक्षाच्या सर्व फ्रंटलच्यावतीने शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जुने बसस्थानक येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उपमहापौर गणेश भोसले, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, नगरसेवक प्रकाश भागानगरे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, संजीव भोर, अ‍ॅड. शिवाजी कराळे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, निलेश इंगळे, अजय दिघे, गणेश बोरुडे, सागर गुंजाळ, नैना शेलार, सुप्रिया काळे, सुजाता दिवटे, योगीता कुडीयाल, साधना बोरुडे, दीपक बडदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close