shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर-मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्गावर तिसरी चाचणी यशस्वी,उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांची माहिती: प्रवास होणार सुपरफास्ट..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२

नगर-मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्गावर तिसरी चाचणी यशस्वी,उपमुख्य अभियंता दीपक कुमार यांची माहिती: प्रवास होणार सुपरफास्ट..!!

अहमदनगर : नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पातर्ंगत अंकाई ते अंकाई किल्ला या 5 किलो मीटर अंतराची चाचणी नुकतीच घेण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यापूर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. नुकतीच अंकाई ते अंकाई किल्ला या 5 किलो मीटर मार्गावर चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 35 किलो मीटर अंतराची चाचणी पूर्ण झाली असून दुहेरी मार्ग व इलेक्ट्रिक लाईनमुळे नगर-मनमाड हा प्रवास सुपरफास्ट होणार असल्याची माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो. मात्र, हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वे गाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासन्तास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागत. आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रीक आणि दुहेरी करण्यात येत आहे. या कामामुळे रेल्वे ताशी 110 प्रति किलो मीटर वेगाने धावणार असल्याने प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसर्‍या टप्प्यात नगर ते दौंडपर्यंत काम पूर्ण होणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज शर्मा, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, उपमुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, सेक्शन इंजिनइर धर्मेंद्र कुमार, इंजिनयर सुद्धांसू कुमार, एक्झिकेटीव्ह इंजिनअर वि. पी. पैठणकर यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आली.


या चाचणीसाठी कॉन्ट्रॅक्टर एस.ए.यादव, तुळशी बिराजदार, सुनिल हेगडे, सुनिल हेगडे, प्रताप शेटे, दीपक येवले, सूरज लोनकने, वैभव क्षिरसागर, शुभम लांडे, राहुल यादव, सुरेश वाघमारे, दीपक येवले, सूरज लोहकणे, शिवा कोणे, तुळशी सिलहाले आदींनी परिश्रम घेतले.

✒️Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close