shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उक्कलगावात दोन दुचाकींचा समोरासमोर भिषण अपघात..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२   
 
उक्कलगावात दोन दुचाकींचा समोरासमोर भिषण अपघात..!!

श्रीरामपुर : उक्कलगावकडून कोल्हारच्या दिशेने चाललेल्या भरधाव बुलेट दुचाकीने समोरून कोल्हारकडून येणार्‍या डिस्कव्हर दुचाकीला उक्कलगावातील कोल्हार नजीक असलेल्या फर्‍याबाग नजीक जोराची धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

           याबाबत समजलेली माहिती अशी की, एकलहरे (आठवाडी) येथील धर्मेंद्र शिंदे यांचा मुलगा व सून संगमनेरकडे बहिणीला भेटण्यासाठी चालले होते.दरम्यान समोरून कोल्हारच्या दिशेने विजय बाबुराव उपाध्ये (रा.सात्रळ-सोनगाव) हे आपली पत्नी व दोन मुलांसह बेलापूर येथे लग्न समारंभासाठी येत होते. दरम्यान दोन्ही दुचाकी परस्परविरोधी दिशेने उक्कलगावातील फर्‍याबागनजीक आल्या असता त्यांचा समोरासमोर भिषण अपघात होऊन दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर विजय बाबुराव उपाध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी खा.सदाशिव लोखंडे काही कामानिमित्त संगमनेरला चालले होते. त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींची विचारपूस केली व अ‍ॅम्ब्युलन्स मिळत नसल्याने स्वत:ची गाडी जखमींना दवाखान्यात जाण्यासाठी दिली. तोपर्यंत ते उक्कलगावमध्ये थांबून राहिले. घटना समजताच घटनास्थळी उक्कलगावच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close