शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२
अहमदनगर : जिल्ह्यातील नगर तहसील कार्यालयात चांगलाच ‘राडा’ झाल्याची घटना समोर आली होती. येथे सुरु असणाऱ्या बैठकीत दोघांनी घुसून तहसीलदार, तलाठी व कर्मचार्यांना धक्काबुक्की करून गोंधळ घातला होता.
या प्रकरणी सचिन एकनाथ एकाडे (वय 35 रा. सारसनगर, चिपाडे मळा, नगर), शाम नामदेव कोके (वय 53 रा. एकतानगर, ता. खेड जि. पुणे) या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटना 18 जानेवारी 2022 रोजी घडली होती.
यादिवशी नगर तहसील कार्यालयात तहसीलदार, तलाठी व महसूल कर्मचारी यांची बैठक सुरू होती. त्यावेळी सचिन एकाडे व शाम कोके या सुरु असणाऱ्या बैठकीत शिरले. तहसीलदार साहेबांसोबत तुम्हाला भ्रष्टाचाराची लागण झाली आहे असा आरोप करत हुज्जत घातली.
यावेळी बैठकीस बसलेले तलाठी, मंडलअधिकारी, कर्मचारी यांना सर्वांना बघून घेतो अशा धमक्या दिल्या होत्या. तसेच तहसीलदार यांच्यासोबत अरेरावी करून बैठक खोलीतील खुर्च्या लोटून दिल्या, बैठकीस आलेल्या महिला तलाठी यांचेकडे बोट करून शिवीगाळ केेले.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एकाडे व कोके विरूध्द भादंवि कलम 353, 186, 504, 506, 509, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाले होते.
आरोपीच्या अटकेसाठी तहसीलमधील कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले होते. दरम्यान पोलीस पथकाने तपासाची सूत्र फिरवत आरोपीना दौंड रोडवरील खंडाळा (ता. नगर) शिवारातून अटक केली.
पुढील तपास उपनिरीक्षक शुभांगी मोरे करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास त्या करत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

