पेपर विक्रेता ते ट्रेकर्स प्रवास
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : दि.३ / नेहमी प्रमाणे ट्रेकिंग दौरा आयोजित केल्या प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळील हडबीची शेंडी जवळ नगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स टिम खाली उतरत असताना मयुर म्हस्के यांची कडी निसटली असता अनिल वाघ वाचवण्यासाठी गेले असता त्यांत दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिल शिवाजी वाघ ( वय ३४ ) मुळ रा.शिराढोण ता.नगर सध्या भिस्तबाग अहमदनगर अनिल वाघ यांचा भांचा मयुर दत्तात्रय म्हस्के (वय २४) रा.दहिगाव ता.नगर अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर प्रविण पवार रा.साकत ता.नगर हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड जवळील हडबीची शेंडी वर आज गिर्यारोहकांच्या पथकाला अपघात होऊन तांत्रिक पथकातील दोघेजण दगावले तर एक गिर्यारोहक गंभीर रित्या जखमी झाला.
अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स या कमर्शियल ग्रुपच्या वतीने हडबीची शेंडी या सुळक्यावर आरोहण मोहीमेचे दि. २ जानेवारी बुधवार रोजी आयोजन करण्यात आले होते. १८ जण यात सहभागी झाले होते, त्यात काही मुलींचाही सहभाग होता. दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरविण्यात आले. शेवटचे तिघे जण उतरण्याच्या बेतात असताना तांत्रिक पथकाचे प्रमुख अनिल वाघ आणि मयूर म्हस्के हे दोघे खाली कोसळले, त्यातला एक जण जागीच गतप्राण झाला.
जखमी प्रविण पवार यास मनमाड येथे उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले. या अपघाताचे वृत्त कळताच कातरवाडी येथील ग्रामस्थ भागवत झालटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित हडबीची शेंडी वर धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांनीच राबविलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळपर्यंत खाली आणण्यात आले होते. मृतांना मनमाड येथे आणण्यात आले असल्याची माहिती मनमाडचे गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी दिली आहे.
अनिल वाघ यांचा जीवनप्रवास कठीण लहान वयातच वडीलाचे छत्र हरपले नंतर सुरुवातीला पेपर विक्रेते म्हणून सुरु झाला. पुढे कराटे, बाॅक्सि, ट्रेकर्स पर्यंत त्यांनी मजल मारली . इंद्रप्रस्थ ट्रेकर्स मध्ये मागील वीस वर्षापासून अनुभवी गिर्यारोहक प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत .
ट्रेकर्स, कराटे , बॉक्सिंग अशा विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

