शहाजीनगर येथे लेडीज शॉपी दुकान जळून खाक
फोटो :- शहाजीनगर येथे आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या दुकानाची अंकिता पाटील यांनी पाहणी केली.
इंदापूर : प्रतिनिधी दि. 2/2/2022
शहाजीनगर ( ता. इंदापूर ) येथील दूर्वा लेडीज शॉपी व पार्लरचे दुकान हे शॉर्टसर्किटमुळे मंगळवारी ( दि. 1) रात्री 10.30 वा. लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले. आगीचे स्वरूप तीव्र असल्याने दुकानातील सर्व साहित्य व फर्निचर हे जळून सुमारे 4 लाख 30 रुपयांचे नुकसान झाले आहे. रेडणी येथील कोमल अक्षय जाधव याच्या मालकीचे दुकान आहे. रात्री उशिरा अचानकपणे लागलेल्या आगीच्या ज्वालांचे लोट दुकानाच्या लांब बाहेर येत होते. आगीचे स्वरूप तीव्र असल्याने दुकानातील साहित्य बाहेर काढता आले नाही, त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढली. निरा भिमा साखर कारखान्याच्या अग्निशामक बबांने आग आटोक्यात आणली. आज बावडा येथील तलाठी यांनी आगीच्या नुकसानीचा जागेवर येऊन पंचनामा केला. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी या जळीतग्रस्त दुकानास बुधवारी ( दि. 2 ) भेट देऊन पाहणी केली.
_____________________________

