shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय...भाटनिमगाव येथे कार्यशाळेचे आयोजन.

रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय...

भाटनिमगाव येथे कार्यशाळेचे आयोजन.

इंदापूर प्रतिनिधी :१ फेब्रुवारी २०२२ दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय असल्याचे मत सेंट्रल रेशीम बोर्ड बेंगलोर चे श्री हिमांशु शरीफ यांनी व्यक्त केले. 


इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव (खबाले वस्ती) येथे १फेब्रुवारी रोजी जैविक रेशीम उद्योग तसेच रेशीम लागवड पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी बोलताना ते म्हणाले हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. नवीन तुती लागवड पध्दत व नवीन किक संगोपन पध्दत यामुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात करता येतो. घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून घेता येतो.

 शेतकयांस कमीत कमी वेळेत महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते. पक्का माल खरेदीची शासनाने निश्चित दराची हमी दिलेली आहे. तुती लागवड, निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. या पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती लागवडीपासून पाल्याच्या उत्पान्नात वाढ होते.

 पट्टा पध्दतीस अत्यंत कमी पाणी लागते. एक एकर ऊस लागणाऱ्या पाण्यात 3 एकर तुती जोपासता येते. .तुतीची लागवड एकदा केल्यानंतर १५ वर्षे पर्यंत जिवंत राहत असल्याने, दरवर्षी लागवड करावी लागत नाही त्यामुळे लागवडीचा खर्च इतर पिकां प्रमाणे वारंवार येत नाही.

दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन यासारखे शेती पूरक व्यवसाय व ऊस, द्राक्षे यासारखी नगदी पिके घेणाऱ्या शेतकयांना देखील हा व्यवसाय चांगल्या रितीने करता येतो. पट्टा पध्दतीने तुतीची आंतरमशागत मजूंराएवजी अवजाराने कमी खर्चात व कमी वेळेत वेळेवर करुन घेता येते. यामुळे मजूरी खर्चात व वेळेत मोठया प्रमाणात बचत होते. पट्टा पध्दतीने लागवड केल्याने तुती शेतीत इतर आंतरपिके घेवून उत्पन्नात भर घालता येते. तुती बागेस रोग व किटक यांचा प्रार्दुभाव होत नसल्याने औषधोपचाराचा खर्च वाचतो. रेशीम अळयांची अंडीपुंज सवलतीच्या दराने ४५० टक्के अनुदान दरात शासना मार्फत पुरवली जातात. रेशीम अळयांचे एकूण २८ दिवसांचे आयुष्यमान असते. त्यातील २४ दिवसच त्यांना तुतीचा पाला खाद्य म्हणून द्यावा लागतो.

 या २४ दिवसांपैक सुरवातीचे १० दिवस शासना मार्फत वाजवी दराने रेशीम किटक जोपासून दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांस अवघ्या १४ दिवसांत कोश उत्पादनाचे पीक घेता येईल. यामुळे शेतकयांचा वेळ, श्रम, व पैसा वाचेल व तसेच एकूण उत्पादनात २५ टक्के पर्यंत वाढ होईल.

*कोट*

रेशीम उद्योगातून इतर फायदे


रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून १ ते दीड लिटर दूध वाढते.
वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात.

 तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.

यावेळी तालुका रेशीम अधिकारी श्री माने,केविके बारामती येथील सौ डांग,नवनाथ रसाळ यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रगतशील बागायतदार मोहन खबाले, दादासाहेब चव्हाण श्रीमंत खबाले यांनी केले होते. यावेळी भाटनिमगाव- बाभूळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.
close