shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये करायचा चोर्‍या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ 

रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये करायचा चोर्‍या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!! 
 
अहमदनगर : रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये येऊन शेतकर्‍याच्या शेतामधील पाण्याची मोटार (वीज पंप) तसेच मोटारीचे साहित्य चोरून नेत होता.
भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत. लक्ष्मण श्रावण वाघमारे (वय 42 रा. झाप सिद्धेश्वर ता. जि. रायगड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा व भिंगार पोलीस ठाण्यात एक असे सात गुन्हे दाखल आहेत.
 
बुरूडगाव (ता. नगर) येथील नंदु बाबासाहेब शिंदे यांची विहीरीवरील केबल कापून कोणीतरी चोरी केल्याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस अंमलदार दिलीप झरेकर, भानुदास खेडकर, राहुल द्वारके, अरूण मोरे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close