shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी मतदार संघातील कोणत्याही दुकानात मद्य विक्री करू देणार नाही- खासदार विखे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ 

शिर्डी मतदार संघातील कोणत्याही दुकानात 
मद्य विक्री करू देणार नाही- खासदार विखे..!!

लोणी : शिर्डी मतदार संघातील माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही. किराणा दुकानात मद्य विक्री सुरू करण्याच्या भ्रष्ट राज्य सरकारच्या निर्णयाला कडकडून विरोध करणार असल्याचे प्रतिपादन नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
लोणी (ता. राहाता) येथील श्री वरद विनायक सेवाधामच्या स्वागत कमानीचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्याहस्ते काल रोजी करण्यात आले. यावेळी सेवाधामचे संस्थापक महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर), भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील, विश्वनाथ महाराज मंडलिक, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, बाळासाहेब आहेर उपस्थित होते.


डॉ. सुजय विखे म्हणाले की, संसदेत मी गोरगरीब व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने पोहोचलो आहे. गोरगरिबांची बाजू संसदेत माडण्याचे कर्तव्य मी सातत्याने करीत राहणार असून माझ्या या भूमिकेमुळे कोणाला काही त्रास होत असेल तर त्याची मी काळजी करणार नाही. किराणा दुकानात मद्य विक्री करण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून या निर्णयाला माझा ठाम विरोध असून कोणीही आडवे आले तरी त्याची तमा न बाळगता चूकीची प्रथा पडू देणार नाही. या चुकीच्या निर्णयाला नियंत्रणात आणण्यासाठी जनतेने देखील आज संकल्प केला पाहीजे.

जर किराणा दुकानात कोणी मद्य विक्री करताना आढळून आल्यास त्या दुकानदाराचे दुकान सिल करून त्याला मोठा विरोध केला जाईल असा इशारा डॉ विखे यांनी दिला. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तिर्थ क्षेत्राचा कसा विकास होउ शकतो हे या वरद विनायक परिसराचे भव्य दिव्य विकास पाहील्यावर आपल्याला लक्षात येईल. सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी सातत्याने विकास करण्याचा प्रयत्न विखे कुटूंबियांचा राहीलेला असल्याचे डॉ. विखे म्हणाले.

"मतदार संघात किराणा दुकानात मद्य विक्री होऊ देणार नसल्याच्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. माता भगिनींच्या कल्याणासाठी व चुकीच्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी सर्व वारकरी संप्रदाय ठामपणे उभे राहणार असल्याचे अभिवचन देतो."
- उध्दव महाराज मंडलिक


✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close